सोन्याची किंमत घसरली! नवीन किंमत ऐकून आनंदाने उडी माराल; इथे पहा नवीन दर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Market Price Today: आजकाल रोजचं जगणं धकाधकीचं झालंय. महागाईनं कंबरडं मोडलंय. पण तरीही आपल्या माणसाच्या डोळ्यांत सोन्याच्या झळाळीचं स्वप्न असतंच. लग्नसराई असो, एखादा खास क्षण असो की फक्त सुरक्षित गुंतवणुकीची सोय सोनं हे आपल्या घराघरातल्या स्वप्नांचा एक मोठा भाग आहे. आज सकाळी बाजारात एक सुखद बातमी मिळाली – सोन्याच्या दरात घट झाली आहे. हो, कालच्या तुलनेत तब्बल ₹450 रुपयांनी दर खाली आला आहे.

हे पण वाचा | खूशखबर! सोनं झाले स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

आजचा भाव असा आहे:

  • 22 कॅरेट सोनं – ₹87,100 प्रति 10 ग्रॅम
  • 24 कॅरेट शुद्ध सोनं – ₹95,020 प्रति 10 ग्रॅम

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे – राज्यातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये जवळपास हेच दर दिसून येत आहेत. अर्थात, तुमच्या गावातल्या स्थानिक सराफाकडे यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, त्यामुळे नक्की विचारूनच खरेदी करा.

हे पण वाचा | राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! वातावरणामध्ये होणार मोठे बदल पुढील पाच दिवस अलर्ट

ही घट का झालीय?

आपल्याला वाटतं की सोन्याचा भाव फक्त भारतातल्या मागणीवर अवलंबून असतो. पण तसं नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात काय चाललंय, त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या बाजारावर होतो.

  • डॉलर-रुपया दर
  • युक्रेन-रशिया युद्धाचं टेंशन
  • अमेरिकेच्या फेडरल बँकेचे व्याज दर
  • या सगळ्यामुळे दर रोज वरखाली होत असतात.

हे पण वाचा | हे कागदपत्र आहेत का? तरच तुमच्या खात्यावरती जमा होणार pm Kisan चे ₹2000 हजार रुपये?

साधी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आज सोनं स्वस्त आहे! आता अनेक घरांमध्ये लग्न सरू लागलीत. काही ठिकाणी साखरपुड्याच्या गाठी बांधल्या जातायत. आणि अशा वेळी सोन्याचा दर कमी असेल तर हे खरंतर सुवर्णसंधी आहे खरं पाहिलं तर शहाणे लोक नेहमी म्हणतात “जेव्हा भाव कमी असतो, तेव्हाच खरेदी केली पाहिजे.” आज हीच वेळ आहे. आता घेतलं तर पुढे दर वाढल्यावर फायदा मिळू शकतो. अर्थात, कोणत्याही गुंतवणुकीसारखीच, यामध्ये थोडं विचारपूर्वकच पाऊल टाकायला हवं. Gold Market Price Today

हे पण वाचा | शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

थोडं थांबा लगेच धावू नका. सोनं खरेदी करताना एक लक्षात ठेवा – दुकानात विचारताना GST, मेकिंग चार्जेस, TCS हे सगळं मिळून अंतिम किंमत थोडी जास्तच लागते. त्यामुळे भाव फक्त बातम्यांमध्ये ऐकून न थांबता, तुमच्या ओळखीच्या सराफाकडे जाऊन, दर नक्की करूनच पुढे जा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की सोनं हे केवळ दागिना नाही. हे आपल्या आईच्या मायाळू हातांचं प्रतीक आहे, आपल्या बायकोच्या स्वप्नातली साडीच्या काठावरची झळाळी आहे, आणि आपल्या मुलीच्या भविष्यासाठीची सुरक्षित शिदोरी आहे.

आज भाव घसरलाय मात्र उद्या वाढेल का माहीत नाही. पण आज ज्याला गरज आहे, ज्याचं मन सोनं घेण्यासाठी आतूर आहे, त्याच्यासाठी ही बातमी म्हणजे एक छोटं सुख आहे – आपल्याला चालून आलेलं. “सोनं स्वस्त झालंय – पण स्वप्नं अजूनही अमूल्यच आहेत.”

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment