लाडक्या बहिणींसाठी सरकारची आणखी एक नवीन योजना! आता महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; पहा सविस्तर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme For Women: राज्यातील महिलांच्या विकासासाठी नेहमीच सरकार वेगवेगळे योजना राबवत आहे. राज्यात सर्वत्र सुप्रसिद्ध ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्यानंतर आणखीन एक सरकारने महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मोफत स्वतःची गिरणी देत आहे. तीही केवळ हजार रुपयात, उरलेले ९० टक्के पैसे सरकार देणार आहे. या योजनेला अर्ज कसा करावा या योजनेची पात्रता निकष काय आहेत या सर्व बाबी आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

“लाडकी बहीण” या योजनेमुळे महिलांमध्ये जे आत्मनिर्भरता निर्माण झाली आहे, त्याचा अनुभव प्रत्येक घरातला पुरुष, प्रत्येक सासू-सासरा अनुभवत आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर ती महिलांच्या आयुष्यातला आत्मविश्वास परत देणारी एक क्रांती होती. आणि आता, सरकारने त्या यशाच्या पायावर आणखी एक पायरी चढवली आहे ती म्हणजे ‘मोफत पिठाची गिरणी योजना’. आज ग्रामीण भागात अजूनही अनेक गावांमध्ये पीठ दळायला ४-५ किलोमीटर लांब जावं लागतं. वेळ, श्रम आणि पैसे सगळ्याचा नाहक खर्च होतो. पण एखाद्या महिलेला घराजवळ गिरणी सुरू करता आली, तर तिचंही उत्पन्न होईल आणि गावातील लोकांनाही मोठा फायदा होईल.

हे पण वाचा | मान्सूनचं आगमन लवकरच; 16 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, पहा हवामान खात्याचा नवीन अंदाज..

सरकारने ही गरज ओळखून एक सुवर्णसंधी महिलांसमोर ठेवली आहे. या योजनेत सरकार थेट ९०% खर्च उचलते. म्हणजे, एखाद्या गिरणीसाठी जर १०,००० रुपये लागले, तर केवळ १,००० रुपये महिलेला द्यावे लागतात. उरलेले ९,००० रुपये थेट सरकारी खात्यातून दिले जातात. ही योजना महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत करणार आहे. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील व कोणत्या महिलांना या योजनेला अर्ज करता येईल अर्ज कसा करावा या सर्व बाबी आपण जाणून घेऊया.

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मोफत पिठाची गिरणी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना गिरणी खरेदीसाठी ९०% अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतात. Government Scheme For Women

हे पण वाचा | खूशखबर! सोनं झाले स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

कोण पात्र आहे?

ही योजना खास करून गरीब, गरजू, अनुसूचित जाती-जनजातीतील महिलांसाठी आहे. खालील अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो:

  • अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातली असावी.
  • ती अनुसूचित जाती किंवा जमातीची असावी.
  • १८ ते ६० वर्षे वयोगटातील असावी.
  • वार्षिक उत्पन्न १.२० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

हे पण वाचा | राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! वातावरणामध्ये होणार मोठे बदल पुढील पाच दिवस अलर्ट

अर्ज करताना लागणारी कागदपत्रं

या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात:

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • गिरणी खरेदीसाठी कोटेशन

हे पण वाचा | पीएम किसान’चा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण वेळेत हे केलं नाही, तर गमवाल 4,000 रुपये!

गिरणी यंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधी!

गिरणी मिळाल्यावर महिला घराच्या अंगणातच व्यवसाय सुरू करू शकतात. रोज थोडं थोडं पीठ दळलं, तरी महिन्याला काही हजार रुपये सहज मिळू शकतात. त्यात जर गावात गरज अधिक असेल, तर त्या मोठ्या प्रमाणात पीठ दळून शेजारच्या गावात विकू शकतात. आज आपण पाहतोय की महागाई वाढते आहे, घरखर्च चालवणं अवघड होतंय. अशा वेळी जर घरातली स्त्रीही काहीतरी कमावू लागली, तर ती घरासाठी बळकटी ठरते. तिचा आत्मविश्वास वाढतो, आणि सगळ्या कुटुंबात सकारात्मक बदल होतो. ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, ती महिलांच्या आयुष्याची दिशा बदलणारी संधी आहे.

कोण म्हणतं गावात संधी नाहीत? जर सरकारने पायउतार होऊन अशा योजना सुरू केल्या, तर त्या वापरणं हे आपल्या हातात आहे. ‘माझं काय होणार?’ असा विचार न करता, ‘मी काहीतरी करणार!’ हा विचार मनात ठेवून पुढे पाऊल टाका. सरकार फक्त मदतीचा हात देते, पण तो हात पकडून उभं राहणं आपल्यावर असतं. गावातली ती साधीशी सून जेव्हा स्वतःचं पीठ दळण्याचं केंद्र सुरू करते, तेव्हा ती फक्त गिरणी चालवत नाही तर ती आपल्या मुलांचे भविष्य तयार करते.

ही योजना तुमच्यासाठी आहे. पात्र असाल, तर अजिबात वेळ दवडू नका. अर्ज करा, स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि जगाला दाखवा की ग्रामीण स्त्री केवळ चुलीपुरती मर्यादित नाही, ती गिरणीसुद्धा चालवू शकते, आणि गरिबीतून वर येऊ शकते. लवकरच या योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत. तुमच्या ग्रामसेवक किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधा आणि तुमच्या नव्या सुरुवातीची पहिली पायरी चढा. Government Scheme For Women

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार तब्बल 23 हजारांचा नफा, बँकांपेक्षा जास्त व्याज देणारी योजना

📝 अर्ज कसा करावा?

  1. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
  • जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कार्यालय येथे भेट द्या.
  • महिला व बालकल्याण विभाग किंवा समाज कल्याण विभाग यांच्याकडून अर्जाचा नमुना मिळवा.
  • आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून संबंधित कार्यालयात जमा करा.
  1. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
  • जिल्हा परिषदांच्या अधिकृत वेबसाइट्सवरून अर्ज सादर करण्याची सुविधा काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, जालना जिल्हा परिषदच्या वेबसाइटवरून अर्ज करता येतो.
  • वेबसाइटवर “समाज कल्याण” विभागाच्या अंतर्गत “पिठाची गिरणी योजना” या पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

हे पण वाचा | या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार तब्बल 3,000 रुपये, कारण काय? जाणून घ्या

योजना कशी मदत करते?

  • महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
  • घरच्या घरी पीठ दळण्याचा व्यवसाय सुरू करून नियमित उत्पन्न मिळवता येते.
  • गावातील इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
  • कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

📌 महत्त्वाची टीप:

ही योजना महिला व बालकल्याण विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्या माध्यमातून राबवली जाते. अर्ज करण्यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, किंवा जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधून अधिकृत माहिती मिळवणे आवश्यक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणींसाठी सरकारची आणखी एक नवीन योजना! आता महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; पहा सविस्तर..”

Leave a Comment