RCB ची ऐतिहासिक विजय पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली, मालक झाले मालामाल! मिळाली इतकी रक्कम 

IPL owner income :– अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर थाटात पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात एक ऐतिहासिक क्षण घडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाने अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या या अंतिम लढतीत आरसीबीने दमदार कामगिरी करत प्रथमच ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली. विराट कोहलीच्या  फलंदाजीने आणि भुवनेश्वर कुमारसह कुणाल पाड्याच्या जबरदस्त गोलंदाजीने पंजाबचा डाव उध्वस्त झाला.

हे पण वाचा | 0ppo ने लॉन्च केला बजेट फोन, फीचर्स आणि किंमत पाहून होताल चक्क ! पहा संपूर्ण माहिती

ही केवळ एक क्रिकेटमधली स्पर्धा नव्हे, तर करोडो रुपयांचा खेळ असलेलं भव्य बिझनेस मॉडेल आहे. त्यामुळे आरसीबीच्या विजयामुळे मालकही अक्षरशः मालामाल झाला आहे. चाहत्यांच्या जल्लोषामागे मोठा आर्थिक लाभ लपलेला असतो.

किती मिळतो मालकाला पैसा?

जरी मैदानावर खेळाडू घाम गाळत असले, तरी त्यांच्या पाठीमागे उभा असलेला मालक वर्ग हे सर्व बघतोय, मोजतोय – आणि त्यांना मिळतोय करोडोंचा फायदा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या हंगामात आयपीएलची बक्षीस रक्कम मागील वर्षासारखीच होती. म्हणजेच, विजेत्या संघाला २० कोटी रुपये बक्षीस मिळालं. उपविजेत्या पंजाब किंग्जला १२.४ कोटी रुपये देण्यात आले. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे ७ कोटी आणि ६.५ कोटी रुपये मिळाले.

हे पण वाचा | 0ppo ने लॉन्च केला बजेट फोन, फीचर्स आणि किंमत पाहून होताल चक्क ! पहा संपूर्ण माहिती

पण हे पुरेसं आहे का?

खरं सांगायचं झालं, तर ही बक्षीस रक्कम हे फक्त वरचं आवरण आहे. संघ मालकांचं उत्पन्न त्याही पलीकडचं असतं. बक्षीसाच्या २० कोटींपेक्षा खेळाडूंना वाटप करून झाल्यावर मालकाकडे फारसं काही उरत नाही. पण तरीसुद्धा मालक करोडोंचा फायदा करतो. कसा?

कमाईचे ‘खेळ’ सुरूच असतात…

आरसीबी किंवा अन्य कोणताही आयपीएल संघ हे केवळ क्रिकेटसाठी नसतात, ते एक ‘ब्रँड’ असतात. या ब्रँडवर जाहिरातदार मोठ्या प्रमाणात पैसे ओततात. संघाच्या जर्सीपासून ते कॅप, बॅग, जाहिरात बोर्ड, डिजिटल कॅम्पेन – सगळीकडून पैसा मिळतो.

प्रत्येक सामन्याचं थेट प्रक्षेपण हे देखील कमाईचं मोठं साधन आहे. यामधून BCCIला मिळणाऱ्या पैशाचा काही भाग संघ मालकांनाही दिला जातो.

हे पण वाचा | 0ppo ने लॉन्च केला बजेट फोन, फीचर्स आणि किंमत पाहून होताल चक्क ! पहा संपूर्ण माहिती

तिकीट विक्री पासून करोडो रुपये ! 

आयपीएलमध्ये मैदानावर बसून सामना बघणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. याचाच फायदा घेत तिकीट दर वाढवले जातात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल ८०% हिस्सा थेट संघ मालकांच्या खिशात जातो. म्हणजे एका मोठ्या सामन्यात लाखोंचं उत्पन्न एका रात्रीत मिळू शकतं.

ब्रँडेड वस्तूंची विक्री

टी-शर्ट, कॅप, पाणीच्या बाटल्या, स्टिकर्स, की-चेन – आरसीबीसारख्या लोकप्रिय संघांच्या वस्तू विकत घेणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये आहे. या वस्तूंवर संघाचा लोगो असतो आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांची मागणी प्रचंड असते. ही एक वेगळी कमाईची शाखा बनली आहे.

हे पण वाचा | 0ppo ने लॉन्च केला बजेट फोन, फीचर्स आणि किंमत पाहून होताल चक्क ! पहा संपूर्ण माहिती

करमुक्त उत्पन्न

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर BCCI कोणताही कर भरत नाही. त्यामुळे या उत्पन्नाचं वाटप थेट मालकांमध्ये आणि BCCIमध्ये केलं जातं. म्हणजेच, मिळालेला नफा साफ आणि टक्कल – कोणताही कट नाही!

आरसीबीचा मालक झाला धनाढ्य

आरसीबीने २०२५ चं आयपीएल जिंकलं, आणि केवळ ट्रॉफीच नव्हे तर करोडोंचा नफा देखील कमावला. विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंमुळे ब्रँड व्हॅल्यू प्रचंड आहे. त्यामुळे प्रायोजकांची रांग लागलेलीच असते. जिंकून आल्यावर विक्री आणि जाहिराती अधिक वाढतात, ज्याचा थेट फायदा संघ मालकाला होतो.

अशाच अनेक माहितीसाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!