Ladki Bahin Yojana May Payment :- महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली. ग्रामीण भागातील महिला, विशेषत शेतकरी महिला, विधवा, एकल महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळतोय. याच योजनेच्या लोकप्रियतेमुळे महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाला, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.Ladki Bahin Yojana May Payment
हे पण वाचा :– या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ
पण सध्या महिलांमध्ये एक वेगळाच संभ्रम पसरलाय कारण मे महिना संपूनही अजून मे महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana May Month Payment) बँक खात्यात जमा झालेला नाही.
मे महिन्याचा हप्ता अजूनही नाही
सामान्यतः या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात (Direct Bank Transfer – DBT) जमा केला जातो. ही रक्कम बहुतांशवेळा महिन्याच्या 15 तारखेपासून 20 तारखेच्या दरम्यान जमा होते. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना मेच्या सुरुवातीलाच मिळाल्यामुळे सर्वांना अपेक्षा होती की मेचा हप्ता मेच्या अखेरीस मिळेल.
हे पण वाचा :– मान्सून आलाय, पण पेरणी थांबवा! शेतकऱ्यांनो, कृषी विभागाचा दिलासा देणारा सल्ला ऐका…”
पण आता मे संपत आला तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिला चिंतेत आहेत “कधी येणार हप्ता?”, “काय गडबड झाली का?” अशा चर्चा सध्या गावी-गावात सुरू आहेत.
मे आणि जूनचा एकत्र हप्ता मिळण्याची शक्यता
माहितीनुसार, सरकारकडून मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात मिळेल अशी शक्यता आहे. एवढंच नव्हे तर, मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे एकत्र ₹3000 रुपये मिळतील, असंही बोललं जातंय.
ही शक्यता अधिक बळकट होते कारण जून महिन्यात वटपौर्णिमा (Vat Purnima Festival) हा महिलांसाठी महत्त्वाचा सण येतो. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, सरकार या शुभ मुहूर्तावर दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करणार आहे.
11 वा आणि 12 वा हप्ता
आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 10 हप्ते (Ladki Bahin Yojana Installments) लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. आता मे महिन्याचा 11 वा हप्ता आणि जून महिन्याचा 12 वा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे.
हे पण वाचा :– या जिल्ह्यातील महिला होणार लखपती! 1 एक लाख 20 हजार महिलांना मिळणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ
सगळे हप्ते DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे महिलांच्या खात्यात येतात. पण यावेळी उशीर झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
महिलांच्या मनात प्रश्नच प्रश्न
“सरकारने एवढं मोठं आश्वासन दिलं, मग वेळेवर पैसे का येत नाहीत?”, “महिन्याचा शेवट झाला तरी मोबाईलवर ‘पैसे जमा’चा मेसेज नाही आलाय…”, “घरखर्च कसा भागवायचा?” अशा भावना ग्रामीण भागातील अनेक महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत.विशेषतः ज्या महिलांचा संपूर्ण खर्च या हप्त्यावर अवलंबून आहे, त्यांच्यासाठी हा उशीर फार त्रासदायक ठरतोय.
अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही
सध्या तरी सरकारकडून (Government Official Update) या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. ना मे महिन्याच्या हप्त्याचा तारीख स्पष्ट झालाय, ना एकत्र हप्ता देण्याचा निर्णय जाहीर झालाय. त्यामुळे महिलांना प्रतीक्षाच करावी लागतेय.
अशाच अनेक नवीन अपडेट साठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा