Free Soybean Seed Scheme 2025 :- शेतकऱ्यांनो, तुम्हाला जर या वर्षी सोयाबीन लागवड करायची असेल, आणि बियाण्याचा खर्च टाळायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारनं राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्य योजनेंतर्गत एक जबरदस्त संधी तुमच्या दारी आणली आहे आता तुम्हाला १०० टक्के अनुदानावर, म्हणजे अगदी मोफत प्रमाणित सोयाबीन बियाणं मिळणार आहे.Free Soybean Seed Scheme 2025
हे पण वाचा :– मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू ! जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला
होय, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही! मोफत बियाणं… तेही दर्जेदार आणि सरकारी अनुदानावर. पण यासाठी तुम्ही २९ मेपर्यंत Mahadbt पोर्टलवर अर्ज करणं अनिवार्य आहे. उशीर केलात तर ही सुवर्णसंधी हुकू शकते.
अर्ज कुठे करायचा?
बरोबर आणि अधिकृत महाडीबीटी पोर्टल म्हणजे:
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin
तुमचं नाव तिथं ऑनलाइन नोंदवायचं आहे. लक्षात ठेवा, कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेंतर्गत अर्ज करताना अॅग्रीस्टॅकवर नोंदणी असणं बंधनकारक आहे.
हे पण वाचा :– मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू ! जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला
बियाणं कुठे मिळेल?
अर्ज मंजूर झाल्यावर तालुकास्तरावरील अधिकृत डीलरकडे बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना इथं-तिथं भटकावं लागणार नाही. योजनेत अर्ज केलेल्या आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर थेट संदेश येणार आहे, आणि ५ दिवसांच्या आत बियाणं उचलून न्यावं लागणार आहे.
किती क्षेत्रासाठी लाभ?
योजनेचा लाभ किमान २० आर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी घेता येईल.
आणि लागवडीची पद्धत लक्षात घेता, एकरी अंदाजे २२ किलो बियाण्याची गरज असते. त्यामुळे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ बॅग मोफत बियाणं मिळणार आहे.
कोणती पद्धत आणि कोण पात्र?
लागवडीसाठी बीबीएफ, रुंद वरंबा सरी, किंवा टोकन पद्धतीचा अवलंब अपेक्षित आहे.
हे पण वाचा :– मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू ! जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला
पात्र लाभार्थ्यांमध्ये –
- वैयक्तिक शेतकरी
- शेतकरी गट
- शेतकरी उत्पादक कंपनी
- महिला आर्थिक विकास महामंडळ, आत्मा, नाबार्ड किंवा ग्रामीण विकास संस्थांमध्ये २४ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी असलेले गट
- या सर्व पात्र गटांना तूर आणि सोयाबीन प्रात्यक्षिकासाठीही १०० टक्के अनुदानावर बियाणं दिलं जाणार आहे.
शेतकऱ्यांची निवड कशी होईल?
- निवड करताना सामाजिक न्यायही पाळलं जातंय
- ७५% सर्वसामान्य शेतकरी
- १७% अनुसूचित जातीचे शेतकरी
- ८% अनुसूचित जमातीचे शेतकरी
- आणि ३०% महिला शेतकरी यांच्यासाठी राखीव संधी आहे
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “मोफत सोयाबीन बियाणे मिळवण्याची सुवर्णसंध शेतकऱ्यांनी असा अर्ज कराच!”