Ladki bahin Yojana update: आता महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची या महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना आहे, आणि महाराष्ट्र राज्यामधील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ही योजना ठरली आहे. व या योजनेने आतापर्यंत लाखो महिलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. व त्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार देखील लागला आहे.Ladki bahin Yojana update:
या योजनेची व्याप्ती व लाभार्थी पहा.
या महत्त्वाकांशी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी 52 लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत. व आता ही संख्या या योजनेच्या व्यापक स्वरूपाची साक्ष देत आहे योजनेच्या लाभार्थ्याच्या माध्यमामधून पात्र महिलांना नियमित आर्थिक लाभ म्हणून ही रक्कम दिली जात असून, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत होईल.
पडताळणीची प्रक्रिया व पारदर्शकता काय आहे ते पहा.
मित्रांनो या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी या महाराष्ट्र राज्य सरकारने कठोरपणे पडताळणीची प्रक्रिया राबवलेली आहे. आणि यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्यावरती योग्य त्याप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. ही प्रक्रिया निरंतरपणे सुरू असून यामुळे या योजनेची पारदर्शकता वाढलेली आहे. व तसेच खऱ्या गरजू महिलांपर्यंत या योजनेच लाभ हा पोहोचण्यासाठी मदत होत आहे.
6 व्या हप्त्याची प्रतीक्षा
या योजनेच्या 6 व्या हफ्त्याबाबत महिला आणि बालकल्याण विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे आणि विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये नवीन लाभार्थी यादी जाहीर केले जाणार आहे आणि पात्र महिलांच्या खात्यामध्ये ताबडतोब सहाव्या हप्त्याची रक्कम ही जमा केले जाणार आहे. पण मात्र या हप्त्यात 1,500 रुपये येणार की 2100 रुपये येणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.