Ladki Bahin Yojana Beneficiary List : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ज्या महिलांच्या नावे वरती चार चाकी वाहन आहे, अशा महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 75 हजार शंभर महिला अशा आहेत त्यांच्या नावावरती गाडी असल्याचं समोर आलेला आहे. यामुळे महिला योजनेच्या निकषांमधून अपात्र ठरणार आहे.
राज्य शासनाने मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केलेली असून, चारचाकी वाहनधारक लाभार्थी महिलांची यादी जिल्हा प्रशासनाकडे आलेली आहे. शासनाने ही यादी परिवहन विभागाकडून प्राप्त करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेली असून, त्यानुसार आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी करणार आहेत. Ladki Bahin Yojana Beneficiary List
पुणे जिल्ह्यामध्ये 75,100 लाभार्थ्यांकडे चार चाकी वाहन
राज्य शासनाकडे चार चाकी वाहनधारकांची लाभार्थी यादी प्राप्त झालेली आहे. यामध्ये 75 हजार 100 महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबांच्या नावे वरती वाहन असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी जिल्हा परिषद सक्रिय झालेले असून, पुणे जिल्ह्यातील दोन्ही याद्या प्रशासनाला मिळालेल्या पहिल्या यादीमध्ये 58,350 तर दुसऱ्या यादीमध्ये 16,750 वाहनधारक महिलांचे नावे आहेत.
या योजनेअंतर्गत काही महिलांना स्वतःहून लाभ सोडण्याची आव्हान शासनाने केलेले होते, परंतु याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना आता थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामुळे अनेक महिला अपात्र ठरण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहेत.
अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी सज्ज
राज्यभरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी( CDPO), प्रवेशिका आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अंगणवाडी सेविकांनाची बहुतांशी महिलांचे अर्ज भरलेले असल्याने त्यांना लाभार्थ्यांनी विषय आधीपासून माहिती आहे. त्यामुळे पडताळणी जलद गतीने पूर्ण करून अपात्र महिलांची यादी शासनाकडे पाठवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहेत.
लाभार्थी महिलांची पडताळणी केली जात आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, या योजने अंतर्गत चार चाकी वाहन असलेल्या महिलांना लाभ घेतल्याचे दिसून आले. यामुळे शासनाने आर्थिक सक्षम लाभार्थ्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडण्याचे आवाहन केलेले होते. परंतु याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने कठोर पडताळणीची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे अनेक महिला या योजनेमधून अपात्र ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अधिकाऱ्यांचा अहवाल आणि पुढील कारवाई
राज्य सरकारने परिवहन विभागाकडून मिळालेली यादी फक्त योजनेचा लाभार्थ्यांसाठीच वर्ग करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या लाभार्थ्यांनीच तपासणी केली जाणार आहे. पडताळणी नंतर अपात्र ठरलेल्या महिलांची यादी जाहीर करून शासनाला सादर केली जाणार आहे. शासनाच्या नव्या निर्देशानुसार अपात्र महिलांकडून योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदत तिची परतफेड करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
सध्याची आकडेवारी
- 21,11,991 – एकूण अर्ज
- 20,89,946 – लाभ मिळालेल्या बहीण
- 75,100 – चारचाकी वाहनधारक लाभार्थी
राज्यभरातून या प्रक्रियेला वेग आलेला असून, लवकरच अंतिम यादी जाहीर होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे देखील प्रशासनाकडे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
1 thought on “या महिला अपात्र ठरणार, लाभार्थी यादी जाहीर!”