या भागात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, तुमच्या भागातील हवामान कसे राहणार जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert | राज्याच्या अनेक भागात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावताना पहिले मिळत आहे. यामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याची दिसून येत आहे. परंतु पुढच्या तीन दिवस कोणत्या भागामध्ये हवामान विभागाने इशारा दिला आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Maharashtra Rain Alert

हे पण वाचा | शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आली मोठी बातमी समोर

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरांमध्ये पुढील तीन दिवस मे जोगर्जनासह व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शहरांमध्ये कमाल तापमान पारा 39. 6 अंशावर आलेला आहे. तसेच तमाल तापमान मध्ये देखील 21.7°c आहे.

तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 24 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यांमध्ये मेगगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच 27 ते 29 एप्रिल दरम्यान राज्यांमध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण राहणार असून राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळीवाऱ्यांच्या ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच येलो अलर्ट देखील हवामान खात्याने दिलेला आहे. Maharashtra Rain Alert

तसेच राज्याच्या वातावरणाबद्दल बघायचे झाल्यावर राजांच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे. सकाळी दमट वातावरण तर दुपारी उन्हाचा चटका तर दुपारनंतर वादळी पोस्ट राज्याचा हवामान मध्ये बदल झालेला आहे ढगाला हवामानामुळे कमाल तापमानामध्ये की मी जास्त होत आहे. तसेच मराठवाडा मध्ये महाराष्ट्र विदर्भ मध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

या भागात गारपीट शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये ‘येलो अलर्ट’ देण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यांचे पिकांची विशेष काळजी घेणे देखल गरजेचे ठरणार आहे.

या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे दक्षिण छत्तीसगड पासून मध्ये महाराष्ट्र कर्नाटक के दक्षिण केरळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. यामुळे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

x
error: Content is protected !!