Maharashtra Weather Update : राज्यातून पाऊस गायब? परंतु, या 10 जिल्ह्यांना मोठा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने (IMD) एक मोठा इशारा दिला आहे. यामुळे राज्याच्या वातावरणात कोणती मोठे बदल झाले हे जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. गेलं काही दिवसांपासून राज्यातून पाऊस अचानक गायब झालेला आहे. परंतु राज्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला तसेच मराठवाडा अजून कोरडाच आहे. याच पार्श्वभूमी वरती या भागातील शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे की, पाऊस कधी येईल?. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण भरले असले तरी, मराठवाड्यातील नामांकित छोटे मोठे धरण अजून कोरडे आहेत. त्यामुळे मराठवाड्याला अपेक्षित पावसाची गरज आहे. या ठिकाणी पेरणी देखील झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांना पावसाची आतुरता लागलेली आहे. Maharashtra Weather Update

अशातच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु, आता पाऊस अचानकच राज्यातून गायब झालेलं चित्र सध्या निर्माण झालेल आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मात्र काही जिल्ह्यांना आज पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आज झालेला हवामान बदलामुळे आणि बंगालचे उपसागरातील प्रणालीच्या भावामुळे पुढील 24 तास राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज राज्यात नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला असून, त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे असे सूचना प्रशासनाने दिले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना मोठा इशारा दिलेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात आज Yellow Alert देण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यासाठी कोणताही इशारा नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

राज्यातील परिस्थिती काय?

सध्या राज्यातील हवामानाचा विचार केला तर अनेक भागांमध्ये पावसाने सध्या उघडतील घेतलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु हा पाऊस शेतकऱ्यांना चिंत लावणारा देखील आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे

त्यामुळे पाऊस पुन्हा कधी सुरू होतो? याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागलेलं आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता कमी राहील परंतु पुन्हा राज्यात पाऊस जोरदार आगमन होणार अशी शक्यता वर्तवली आहे.

( टिप: पुढील दिलेली माहितीही हवामान खात्याच्या अंदाजावर आधारित असून स्थानिक वातावरणाची माहिती वेगळी असू शकते. योग्य माहिती जाणून घेण्यासाठी IMD च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पहावे.)

हे पण वाचा : महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार पुनरागमन: पंजाबराव डखांचा या जिल्ह्यांना ‘अलर्ट’; जिल्ह्यांची यादी इथे पहा

Leave a Comment

error: Content is protected !!