Monsoon Rain In Maharashtra: शेवटी तो क्षण आलाच… गेले कित्येक दिवस डोळ्यांत प्राण आणून ज्याची वाट पाहत होतो, तो आपल्या महाराष्ट्रात अखेर दाखल झाला! नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून आज रविवार (दि. २५ मे) रोजी महाराष्ट्रात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. या वर्षी मान्सूनने घेतली वेगवान वाटचाल सुरू आहे
१२ दिवस आधीच महाराष्ट्रात आगमन
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच सुमारे ७ जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होत असतो. पण यंदा मात्र निसर्गानेही चकित करणारा वेग घेतला आणि अवघ्या २५ मे रोजीच मान्सूनचं आगमन झालं. ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर ही लाखो शेतकऱ्यांच्या आशेची पालवी आहे. हे आहे डोंगररांगांमधून वाहणाऱ्या झऱ्यांचं पुन्हा एकदा जागं होणं… हे आहे उन्हातान्हात पाण्याच्या हंड्यांसाठी वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांना आलेली सुस्कारा देणारी बातमी आहे.
हे पण वाचा | महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना देतील जबरदस्त नफा; जाणून घ्या सविस्तर..
मुंबई, ठाणे, पुण्यात लवकरच पावसाचा शिडकावा
मुंबईत सकाळपासून आकाशात काळसर ढगांचे लोट जमा झाले होते. अंगावर येणारा दमट वारा आणि ढगाळ वातावरण पाहून लोकांना आज काहीतरी वेगळं होणार याची चाहूल लागली होती. हवामान विभागानुसार, लवकरच मान्सून मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागात दाखल होणार आहे. यासाठी मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट देण्यात आला असून रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
गोव्यात आधीच मुसळधार पावसाने घेतली धडक, रस्ते नदीसारखे वाहू लागले
गोव्यात पावसाने आधीच रौद्र रूप धारण केलं आहे. म्हापसा, पणजी, वास्को आदी ठिकाणी पावसाचं पाणी घरात आणि बाजारात घुसलं. रस्त्यांवरून प्रवास करणं अशक्य झालं आहे. आज गोव्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असून, पुढचे काही दिवस तिथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार; या तारखेला जमा होणार ₹1500?
तळकोकणातही विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांमुळे वीजपुरवठा खंडित
रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागातही मान्सूनने आपला झंझावात दाखवायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडली आहेत, वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळते आहे. पण तरीही, लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नाही. Monsoon Rain In Maharashtra
शेतकऱ्यांचा दिलासा, खरिपाच्या तयारीला वेग
राज्यातील बहुतांश शेतकरी खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. मागील काही वर्षात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. यंदा मात्र पाऊस लवकर आल्यामुळे खरिपाच्या तयारीसाठी वेळ मिळणार असून, खरीप हंगाम आशेने भरलेला आहे. नांगरलेली शेतं, वाफसा झालेली माती आणि या पावसाने मृदगंधाने भरलेली हवा… ही खरी खरी आनंदाची गोष्ट आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो! 30 मे पूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही…
किनारपट्टी भागात शुकशुकाट, पर्यटन आणि मत्स्यव्यवसायावर परिणाम
दुसरीकडे रायगडसारख्या किनारपट्टी जिल्ह्यांत चक्रीवादळाच्या भीतीने पर्यटक फिरकले नाहीत. रविवार असूनही अलिबागसारख्या ठिकाणी समुद्र किनारे ओस पडले होते. स्थानिक व्यावसायिक आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना याचा फटका बसल्याचं चित्र आहे.
मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही… तो आहे आशा, नवा श्वास, नवं चैतन्य! उन्हाच्या लाटांनी होरपळलेल्या जनजीवनाला हा पाऊस नवसंजीवनी देतो. शेतकऱ्यांची ओठांवरची हसू हीसुद्धा आभाळाला जाईल इतकी मोठी असते. त्यामुळे मान्सूनच्या या आगमनाला केवळ हवामान अपडेट म्हणून न पाहता, ती एक आनंदाची, आशेची आणि नवजीवनाची सुरुवात आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा