लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ‘या’ दिवशी खटाखट पैसे जमा होऊ शकतात..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या आठ तारखेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर मार्च महिन्याच्या 12 तारखेला मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यानंतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे.

हे पण वाचा | लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती समोर आलेले नाही. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुढील हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी रामनवमी सहा एप्रिल 2025 रोजी आहे त्यामुळे सहा ते दहा तारखे दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात.

दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. अनेक लाडक्या बहिणींनी निकषाचे पालन न करता या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा महिलांची छाननी सरकारकडून करण्यात आली असून आत्तापर्यंत नऊ लाख महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. यातील पाच लाख महिला जानेवारी महिन्यात तर चार लाख महिला फेब्रुवारी महिन्यात अपात्र झाल्या आहेत. अजून मार्च महिन्यात किती महिला अपात्र होणार याचा आकडा समोर आलेला नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार एकूण 50 लाख महिला या योजनेतून अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या महिला अपात्र झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाही.

हे पण वाचा | राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज

दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या निकषाबद्दल अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाले त्यांच्याकडून पैसे सरकार परत घेणार नाही. या योजनेत दुरुस्ती करण्यात येणार आहे ही योजना बंद होणार नाही अशी देखील त्यांनी यावेळी म्हटले होते. यासोबतच या योजनेत काही नवीन निकष आणण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेत आणखीन कोणते नवीन निकष येतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पडताळणी दरम्यान कोणत्या महिलांचे अर्ज अपात्र होतील याची देखील महिलांना धास्ती लागली आहे. Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा दरम्यान आमची सत्ता आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी दिले होते. मात्र सरकार स्थापन झाले त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प देखील सादर झाला मात्र लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी तब्बल आणखीन एक वर्ष वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. या अर्थसंकल्पात याबाबत कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे आता पुढील अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होईल अशी आशा वर्तवली जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ‘या’ दिवशी खटाखट पैसे जमा होऊ शकतात..”

Leave a Comment