सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra government salary hike news :- महाराष्ट्रातील 17 लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवण्यात आला असून याचा थेट परिणाम त्यांच्या पगारावर होणार आहे. Maharashtra government salary hike news

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारचाही मोठा निर्णय

मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 55% DA मिळत आहे. याच पावलावर पाऊल टाकत देशातील अनेक राज्य सरकारांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवला – त्यात राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम यांचा समावेश आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राज्य कर्मचारी संघटनांनी देखील सरकारकडे DA वाढवण्याची मागणी लावून धरली होती.

राज्य सरकारचा मोठा निर्णय: DA 55% वर

राज्य सरकारने आता ही मागणी मान्य करत 53% वरून 55% पर्यंत महागाई भत्ता वाढवला आहे.
15 मे 2025 रोजी राज्याच्या वित्त विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) काढला असून तो जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे.यामुळे फक्त भविष्यातील पगारच नव्हे तर मागील चार महिन्यांचा DA फरक देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

कोणता महिना पासून फरक मिळणार?

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2025 या चार महिन्यांचा फरक मे महिन्याच्या पगारात मिळेल.म्हणजेच जून महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.

या निर्णयाचा प्रभाव काय?

  • सर्वसाधारण कर्मचाऱ्यांचा मासिक पगार वाढणार
  • पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार
  • DA फरकामुळे एकरकमी मोठी रक्कम मिळेल
  • वाढीव खर्चाचा सामना करायला आता अधिक सोप्पं जाईल

कर्मचाऱ्यांसाठी दिलासा

महागाईचा दर वाढत असताना, सरकारकडून मिळणाऱ्या DA मध्ये वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बाब आहे.या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा 

1 thought on “सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!”

Leave a Comment