PM Kisan Yojana 2025 :- शेती हा आपल्या देशाचा कणा आहे. या कण्यावर उभं असलेलं लाखो कुटुंबांचं आयुष्य, कष्ट, दुःख, आनंद आणि आशा या सगळ्याच गोष्टी शेतकऱ्याच्या एका हिशोबाने मोजल्या जातात. आणि म्हणूनच राज्य असो की केंद्र सरकार, शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी योजना जाहीर केल्या जातात. त्यातलीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.
हे पण वाचा :– मोफत सोयाबीन बियाणे मिळवण्याची सुवर्णसंध शेतकऱ्यांनी असा अर्ज कराच!
२०१९ साली केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. सुरूवातीपासूनच ही योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली. कारण अगदी थेट, कसलाही मध्यस्थ न ठेवता, पैशाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते. वर्षातून तीन वेळा २ हजार, २ हजार, २ हजार असे मिळून ६ हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्याला मिळतात.
आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत १९ हप्ते जमा झालेत. १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्याआधी १८ वा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये जमा झाला होता. म्हणजेच ४ महिन्यांच्या अंतराने हप्ते मिळत आहेत. हा हिशोब लावला तर २० वा हप्ता जून २०२५ च्या अखेरीस येण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :– मे आणि जूनचा हप्ता एकत्र? ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अजूनही नाहीत खात्यात, महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण
अर्थात, अजून केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, पण हप्त्याचा जो पॅटर्न आहे, त्यावरून अंदाज बांधला जात आहे.
कोणाला होतो या योजनेचा लाभ?
या योजनेचा फायदा फक्त लघु व सीमान्त शेतकऱ्यांना होतो. म्हणजे ज्यांच्याकडे २ हेक्टर किंवा त्याहून कमी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळते. अगदी छोटे शेतकरी, ज्यांचं उत्पन्न तुटपुंजं असतं अशा लोकांना ही योजना आधार देते.
एकच कुटुंब, एकच लाभार्थी
अलीकडे सरकारने या योजनेत एक मोठा नियम बदल केला आहे. आधी पती-पत्नी दोघे किंवा मुले, मुली वेगवेगळ्या नावाने अर्ज करून लाभ घेत होते. पण आता एकाच कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे. उरलेल्या सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर घरात एकापेक्षा जास्त सदस्यांनी अर्ज केले असतील, तर आता केवळ एकालाच मंजुरी मिळेल.
हे पण वाचा :– सोन्याची किंमत घसरली! नवीन किंमत ऐकून आनंदाने उडी माराल; इथे पहा नवीन दर..
माझं नाव यादीत आहे का?
हे तपासणं फार महत्त्वाचं आहे. आधी हप्ता मिळाला असला तरी यावेळी नाव आहे की नाही, हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- 1. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- 2. ‘Beneficiary Status’ किंवा ‘लाभार्थी यादी’ वर क्लिक करा.
- 3. तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाका.
- 4. यामधून तुमचं नाव आहे की नाही ते सहज समजेल.
- जर नाव नसेल, तर शक्यतो शेजारच्या CSC सेंटरमध्ये जाऊन चौकशी करा.
अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला येथे क्लिक करून जॉईन करा