Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये ही लहानगी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता, बेंजोच्या तालावर इतक्या उत्साहात थिरकतेय की, तिचा डान्स पाहून मोठमोठे डान्सर्सही तोंडात बोटं घालतील. या चिमुकलीचा निरागसपणा आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं! हे अगदी खरं आहे. त्यांची प्रत्येक कृती मनापासून असते. त्यांच्यात कोणतीही लबाडी नसते, ना स्वार्थीपणा. ते अगदी मनमोकळेपणाने जगतात आणि कसलीच चिंता करत नाहीत. या व्हायरल व्हिडीओमधील चिमुकली याचेच उत्तम उदाहरण आहे. बेंजोच्या तालावर ती ज्या प्रकारे डान्स करतेय, ते पाहून तिचा प्रत्येक क्षण ती किती एन्जॉय करतेय हे स्पष्ट दिसतंय. तिच्या स्टेप्समध्ये सहजता आहे आणि तिचा उत्साह तर ओसंडून वाहतोय.
हा व्हिडीओ @gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला “चिमुकलीच्या डान्सने सर्वांची मने जिंकली!” अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, त्याला आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, चिमुकलीचा डान्स मात्र लाखो लोकांच्या मनात घर करून बसला आहे. Viral Video
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या व्हिडीओवर युजर्सकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. “अप्रतिम! खूप छान”, “काय नाचलीय राव ही”, “आतापर्यंतची सर्वांत सुंदर रील! खूप छान”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. “नाद करायचा नाही”, “एक नंबर”, “लय भारी”, “जाम भारी” अशा शब्दांत अनेकांनी या चिमुकलीच्या डान्सचे कौतुक केले आहे.
खरंच, अशा प्रकारचे व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं. लहान मुलांचा निष्पाप आनंद आणि त्यांचा बिनधास्त डान्स आपल्या मनालाही रिफ्रेश करून जातो. या चिमुकलीने आपल्या डान्सने केवळ लाखो व्ह्यूजच मिळवले नाहीत, तर अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य देखील आणले आहे. तिचा हा व्हायरल डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही तिच्या कौतुकाशिवाय राहणार नाही.