Sarkari Naukri Maharashtra | राज्यात सध्या निवडणुकांचं वातावरण तापलंय. मुंबई महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातच आता सरकारकडून एक मोठी घोषणा समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्यात मेगा नोकरभरती होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही बातमी म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक दिलासा देणारी संधी आहे. Sarkari Naukri Maharashtra
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!
राज्यातील अनेक विभागांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. याच रिक्त जागांचा आढावा घेऊन विभागनिहाय नियोजन करून भरती केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या भरतीतून अनेक कुटुंबांच्या भविष्याला नवी दिशा मिळू शकते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ठामपणे सांगितलं की, “सरकार कुठेही मागं नाही, नोकरभरती ही आमचं प्राधान्य आहे.” मात्र, भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होऊ नये, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. याच मुद्द्यावरून मंत्रालयात चर्चा झडली आणि एक लक्षवेधीही उपस्थित करण्यात आली. खासदार भीमराव केराम यांनी आरक्षित जागांवर बोगस आदिवासींनी नोकऱ्या मिळवल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी नव्या नोकरभरतीची घोषणा केली.
याआधी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ७५ हजार पदांची भरती जाहीर झाली होती. पण प्रत्यक्षात एक लाखांहून अधिक नोकरदार भरती झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. फडणवीस म्हणाले, “आता पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे. सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागाला आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सेवाप्रवेशाचे नवीन नियम तयार करण्यासही सांगितले आहे.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरभरतीसाठी असलेले सध्याचे नियम खूप जुने आहेत. त्यामुळे उमेदवार न्यायालयात जातात, आणि प्रक्रियेला विलंब होतो. आता हे नियमच सुधारले जाणार आहेत. प्रत्येक विभागाला नव्या नियमांची अंमलबजावणी करायला सांगण्यात आलं आहे. आणि हे नियम मंजूर होताच मोठ्या प्रमाणात भरती सुरू केली जाणार आहे.
आदिवासी विभागातल्या बोगस नोकऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “१९९५ पूर्वी बोगस जात दाखले दिलेल्यांना सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलंय. पण २००५ नंतर कोणालाही जात वैधता प्रमाणपत्राशिवाय नोकरी दिली जाणार नाही.” या विभागातील रिक्त जागांवर लवकरच भरती केली जाणार आहे.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!
सरकारच्या या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट होते राज्यात तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही संधी फार महत्त्वाची आहे. भरतीची प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य होईल, असं सरकारने आश्वासन दिलं आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी वणवण भटकणारे अनेक तरुण आहेत. कधी परीक्षा, कधी मुलाखती, तर कधी आरक्षणाच्या किचकट अटी यातच त्यांचं आयुष्य अडकलंय. पण आता हे चित्र बदलणार असल्याचं या घोषणेमधून दिसतंय.