Loan waiver beneficiary list : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार असून त्यापूर्वी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. काही तुरळक शेतकऱ्यांच्या नावाची पहिली लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीचं औचित्य साधत, बुधवारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत ५३३ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना एकत्रितपणे तब्बल २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभमिळणार आहे.
यादी मध्ये फक्त 533 शेतकऱ्यांचे नाव?
ही यादी इतकी लहान का असा प्रश्न अनेकाच्या मनामध्ये उपस्थित झाला असेल. परंतु सरकारने आज स्पष्ट उत्तर दिला आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती प्राप्तिक विभागाकडून अद्याप सरकारला मिळाले नाही. त्यामुळे तात्पुती फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचेच नाव या यादीमध्ये जाहीर करण्यात आल आहे. याचा अर्थ असा आहे की, ही केवळ सुरवात आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्याचे नाव पुढच्या काही टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्याचे नाव या यादीमध्ये अजून आले नाहीत त्यांनी लगेच निराश व्हायचं नाही कारण लवकरच सरकार पुढची यादी जाहीर करणार आहे. Loan waiver beneficiary list
यादीत नाव आलं पुढे काय करायचे?
फक्त यादी मध्ये नाव येऊन काम चालणार नाही. त्यानंतर एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या योजने मध्ये ज्या शेतकऱ्याच नाव यादीत आल आहे. त्यांना जवळचे आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणे ( Aadhar KYC, किंवा आधार लिंक) करून करून घ्यावे लागेल. त्यानंतर अजून ॲग्री स्टिक (फार्मर ID) नोंदणी झालेली नाही. त्यांना ती याच केंद्रावरती पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाली की मग प्रत्यक्ष कर्जमाफीचे रक्कम खात्यात जमा होईल. त्यामुळे नाव यादीत दिसताच वेळन दवडता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तरी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर कर्जमाफी मिळू शकत नाही. या योजनेचा लाभ जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यातही एक वेगळा गट आहे ज्या सुमारे दोन लाख 90 हजार शेतकऱ्यांवर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
जिल्हा निहाय पहिली यादी तुमचं नाव आहे का यामध्ये?
पहिल्या सर्वाधिक यादी मध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आहेत, यामध्ये 182 शेतकरी पात्र आहेत. तर लातूर जिल्ह्यातील 133 शेतकरी पात्र आहेत. तर पुणे जिल्ह्यातील 85, अमरावती जिल्ह्यातील 58, शेतकरी सातारा जिल्ह्यातील 38, शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील 21 शेतकरी आणि नागपूर जिल्ह्यातील सोळा शेतकरी अशी जिल्हा निहाय यादी आहे.
