Maharashtra Rains Weather Update : रेड अलर्ट ! पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा कहर, १६ गावांचा संपर्क तुटला, अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rains Weather Update | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा हाय अलर्ट जारी केलेला आहे. यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच 21 जुलै ते 22 जुलै या दरम्यान रात्रभर आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडला. सकाळी हवामान खात्याने घाट माथ्यावरती रेड जारी केलेला आहे. इथे पुन्हा एकदा अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या भागासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तसेच मुंबई आणि उपनगरात रात्रभर पाऊस काय थांबायचं नाव घेतच नाही. इथे या ठिकाणी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा आव्हान करण्यात आलेला आहे. Maharashtra Rains Weather Update

पालघर जिल्ह्याला सर्वाधिक फटका?

सध्या पावसाचा धुमाकूळ राज्यभर चालू आहे. परंतु याचा सर्वाधिक फटका हा पालघर जिल्ह्याला बसलेला आहे. गेल्या तीन दिवसापासून इथे पावसाने अक्षरश धुमाकू घातला असून, आज डहाणू आणि तलसारी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालेला आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. सारणी उर्से एन मुख्य मार्गावरती पाणी इतके वाढला आहे की, आसपासच्या तब्बल 14 ते 15 गावांमध्ये मुख्य बाजारपेठेची संपर्क तुटला असून सूर्य नदीकाठावरील 64 ते 65 गावांना जिल्हा प्रशासनाने मोठा इशारा दिलेला आहे. डहाणू, विवर लोकल सेवा ही पूर्ण ठप्प पडली असून प्रशासनाने नागरिकांना योग्य त्या काळजी घेण्याचा सूचना दिलेल्या आहेत आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालघर मधील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेले आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ?

भारतीय हवामान खात्याने इतर जिल्हा प्रमाणेच मुंबईसाठी देखील एक महत्त्वाची बातमी दिली आहे. यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी तानसा जलाशय पूर्ण भरून ओसंडन वाहू लागला आहे. विहार आणि तुळशी हे तलाव आधीच तुडुंब भरले होते आणि आता तानसा हा त्याच सामील झाल्याने मुंबईचे सात पैकी तब्बल तीन जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सर्व जलाशयातील एकत्रित पाणीसाठा आता एकूण क्षमतेच्या 62 टक्क्यांवर पोहोचला असून, यामुळे मुंबईकरांवर घोंगणावर संभाव्य पाणी कपातीचा संकट सध्यातरी दूर झाल आहे.

सांगली जिल्ह्यातील शिरवळ तालुक्यातील वारणा चांदोली खोराने पात्र पुंज परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे, याचा थेट परिणाम म्हणून वारणा धरणातील पाणीसाठा सपाट्याने वाढत आहे. आज गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हे धरण तब्बल 75.13% भरला असून एकूण पाणीसाठा पंचवीस.84 टीएमसी वर पोहोचला आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा ?

एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने रौद्ररूप धारण केला असतांना मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाने हजेरी लावलेली आहे. गेल्या महिनाभर पावसाची वाट पाहणाऱ्या हा एक मोठा दिलासा आहे. याच कारणामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

पुढील 48 तास कसे असतील ?

हवामान खात्याचा अंदाजानुसार, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 48 तासात पावसाचा जोराचा कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बोरवली, अंधेरी, बदलापूर, अंबरनाथ पनवेल, पालघर आणि भिवंडी या भागात रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अजून थांबलेला नाही.

(टीप: वरील माहिती उपलब्ध वृत्तांवर आधारित असून, परिस्थिती वेगाने बदलू शकते. तुमच्या भागातील ताजी स्थिती आणि अधिकृत इशाऱ्यांसाठी स्थानिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय हवामान विभागाचं (IMD) संकेतस्थळ जरूर तपासा.)

Leave a Comment

error: Content is protected !!