शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज! जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस राज्यातून होणार गायब? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Important Weather Forecast : पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हवामान अंदाज समोर आलेला आहे. यंदा सुरवातीपासूनच राज्यात पावसाने अपेक्षाप्रमाणे हजेरी लावली नाही पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजातून स्पष्ट माहिती समोर आली आहे की, 26 जुलै रोजी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस अपेक्षित असला तरी एकंदरीत जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आता हाच हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरणार आहे. Maharashtra Important Weather Forecast

भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय?

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर एक कमी दाबाचे क्षेत्र सध्या सक्रिय झाल आहे. यामुळे 25 ते 28 जुलै या कालावधीमध्ये देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या प्रणालीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सातारा आणि ठाणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मात्र 30 जुलै पर्यंत हा जोर पुन्हा वसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, ऑगस्टच्या सुरुवातीला ही मान्सून पुन्हा जोमाने सक्रिय होण्याची शक्यता कमीच आहे. पुढच्या पंधरवाड्यात तुरळक सरी पडतील, पण कुठलाही मोठा सक्रिय हवामान प्रणाली शिवाय मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रा तुलनेने बरा पाऊस होईल मात्र मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यासाठी जुलै महिना सरासरीपेक्षा कोरडा जाण्याची चिन्ह आहेत.

देशातील हवामान अंदाज कसा?

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 23 जुलै ते 29 जुलै या कालावधीत दक्षिण भारत मध्य भारत आणि पूर्व भारतातील अनेक राज्यात अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्राचा यात समावेश नाही. त्यानंतर 30 जुलै ते पाच ऑगस्ट या आठवड्यात हे चित्र कायम राहणार आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि पूर्व मध्य भारत मध्य मुसळधार पावसाचा अंदाज असताना महाराष्ट्रात उर्वरित भागांना मात्र सरासरी पेक्षा कमी पावसाचा इशारा दिलेला आहे.

तज्ञांचे म्हणणे काय?

भारतीय हवामान विभागाच्या पुणे केंद्रातील शास्त्रज्ञ S D सानप यांनी या परिस्थितीचा सविस्तर विश्लेषण मांडल आहे. त्यांच्या मते, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण सामान्य ते सामान्य पेक्षा कमीच राहण्याची शक्यता असून, मान्सूनच्या मोठ्या प्रमाणावरील सक्रितेचा सध्यातरी कोणताही पष्ट संकेत दिसत नाही. हवामानाच्या विसंगत दर्शवणाऱ्या नकाशांमध्ये महाराष्ट्रावर सध्या मोठ्या प्रमाणावर पांढरे भाग दिसत असून, त्यात पावसाचा जोरदार ठेवणाऱ्या नारंगी किंवा लाल छटांचा अभाव आहे. यावरूनच पाऊस सर्वसाधारण किंवा त्याहून कमी राहण्याचे संकेत मिळतात असं सानप यांनी नमूद केल. ऑगस्ट महिन्याचा सविस्तर व अंतिम अंदाज याच महिन्याच्या अखेर एस जाहीर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केला.

विदर्भात पावसाचा इशारा?

आज रविवारी अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, पश्चिम आणि यवतमाळ विदर्भातील जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचण्याची आणि परिणामी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एकंदरीत हा अंदाज पाहता जुलै अखेर आणि ऑगस्ट च्या सुरुवात ही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा राहणार आहे. ज्या भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. तिथे पेरणी किंवा फवारणी सारखी काम करण्याआधी हवामान खात्याचे साप्ताहिक अंदाज जरूर तपासावेत, कारण मोठी सक्रिय यंत्रणा नजीकच्या काळात दिसत नसल्याने पावसाचे प्रमाण अनियमितिच राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!