या दोन जिल्ह्यांमध्ये होणार मोठा महामार्ग, 10 हजार कोटींचा प्लॅन? पहा संपूर्ण रूट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jalgaon, Chhatrapati Sambhajinagar Expressway : जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सरकार आता लवकरच मोठा पाऊल उचलणार आहे आणि या शहरांमधील प्रवासाचे वेळ वाचवणार आहे. या दोन महत्त्वाचे शहरांचे आता प्रवासाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकार रस्ते व विकास महामंडळाकडून जळगाव पर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याची योजना आखली असून, याच माध्यमातून आता छत्रपती संभाजी नगर ते जळगाव खानदेश असा मोठा महामार्ग उभारला जाणार आहे. हा महामार्ग प्रत्यक्ष सेवेत आल्यानंतर सध्या जळगाव साडेतीन तास लागणारा प्रवास एका तासाच्या आसपास पूर्ण करण्याची शक्यता वर्तवणत येत आहे.

छत्रपती संभाजी नगर ते जळगाव या दरम्यानचा प्रस्तावित असलेला हा दुर्गती महामार्ग तब्बल 122.60 किलोमीटर पर्यंत लांबीचा असणार आहे महामार्ग सहा पदरी आणि प्रवेश नियंत्रित पद्धतीचा असेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी शासनाला जवळपास 10.931.36 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. Jalgaon, Chhatrapati Sambhajinagar Expressway

या महामार्गाच्या सरेखनाचा अभ्यास करून सल्लगार कंपनीने तीन वेगवेगळे पर्याय राज्य सरकार समोर ठेवलेले आहेत. त्यापैकी निश्चित करण्यात आलेल्या सरेखनाचा प्रस्ताव आता मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, त्यामुळे सरकारच्या मंजुरीनंतर पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर किंवा जळगावहून छत्रपती संभाजी नगरला जाण्यासाठी वाहनचालकाला मोठी कंबर कसावी लागते. या ठिकाणी त्यांना जवळपास साडेतीन तासांचा वेळ लागतो. मात्र, नवीन महामार्ग तयार झाल्यानंतर हेच अंतर जवळपास एक तासांमध्ये पार करण्याची उद्दिष्ट आहे. महामार्गाची संकल्पना वेगमर्यादा ताशी 150 किलोमीटर ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर यांच्यातील संपर्क अधिक वेगवान होणार असून या दोन शहरा दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो.

समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडले आहे. आता या महामार्गाचा आणखी विस्तार करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प पुढे आणले जात आहेत. जालना-नांदेड, नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली अशा मार्गांचाही विस्तार प्रस्तावित आहे.

त्यामुळे जळगाव-छत्रपती संभाजीनगर हा नवीन द्रुतगती मार्ग प्रत्यक्षात कधी येणार आणि त्याच्या बांधकामाला कधी सुरुवात होणार, याकडे आता खान्देश आणि मराठवाड्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

10 हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाचा हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहिला, तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमधील अंतर फक्त किलोमीटरने नाही तर वेळेच्या दृष्टीनेही मोठ्या प्रमाणात कमी सरेखनाचा आहे. त्यामुळे हा महामार्ग खान्देशच्या विकासासाठी पुढील काही वर्षांत महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

( Disclaimer : वरील दिलेली सर्व माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे.)

हे पण वाचा : मोठी बातमी ! महाराष्ट्राला आणखी एक मोठा महामार्ग होणार, कुठून ते कुठपर्यंत असणार महामार्ग

Leave a Comment

error: Content is protected !!