देशभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? महाराष्ट्रासाठी नवीन अंदाज काय पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : राज्याच्या वातावरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, भारतीय हवामान खात्याने सध्या संपूर्ण भारतामध्ये एक नवीन अंदाज जाहीर केलेला आहे. उत्तर पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरावर एक तीव्रत कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल असून, याच प्रभावामुळे देशातील अनेक राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मध्य पदेश, उत्तर प्रदेश, आणि छत्तीसगडसह, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील कोकण विदर्भात देखील पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची बातमी समोर आलेली आहे. नक्कीच हा हवामान अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे. अनेक दिवसापासून महाराष्ट्रातून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता हा हवामान अंदाज शेतकऱ्यांना एक दिलासादायक ठरणार आहे. सविस्तर अंदाज काय? व पुढे कशी परिस्थिती राहणार सविस्तर माहिती जाणून घ्या. Weather Update

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21, 22 ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळ ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडिसा, झारखंड आणि ईशान्यकडील राज्यात देखील 26 आगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता ?

कोकण आणि गोवा : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 26 ऑगस्ट या दरम्यान कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवडाभर जोर कमी अधिक प्रमाणात राहील.

विदर्भ : विदर्भासाठी सर्वात लक्षवेधी बातमी ती म्हणजे 23 आणि 24 ऑगस्टची. या दोन दिवसांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे, बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाच्या तुटीमुळे त्रस्त असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक एक बातमी ठरू शकते.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा : इतर भागाप्रमाणे या भागात देखील तुलनेने सोम्य चित्र राहील. 26 ऑगस्टपर्यंत इथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार असे राज्यातील येत्या काही दिवस वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला.

( वरील हवामान अंदाज प्रसारमाध्यम व हवामान खात्याच्या अंदाजावर आधारित आहे)

हे पण वाचा : पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार

Leave a Comment

error: Content is protected !!