सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: आज सकाळी जेव्हा बाजार उघडला, तेव्हा एका सुखद धकक्यासारखी बातमी समोर आली – सोनं स्वस्त झालं होतं! पण त्याच वेळी चांदीच्या दराने मात्र उंच भरारी घेतली होती. अशावेळी कोण खरेदी करायचं आणि कोण थांबायचं हे समजून घेणं गरजेचं आहे.

हे पण वाचा | महाडीबीटीवरील जुन्या अर्जाचं काय होणार? अर्ज पुन्हा करावा लागणार का?

आज २७ मे रोजी, २४ कॅरेट सोन्याचा दर थेट १४६ रुपयांनी घसरला आणि तो ९५,६६७ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. म्हणजेच, जीएसटी धरून सोनं आता सुमारे ९८,५३७ रुपये दरानं विकलं जातंय. दुसरीकडे, चांदीच्या दरात चक्क ४४८ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा नवा दर आता थेट ९७,३५७ रुपये प्रति किलो इतका झाला असून, जीएसटी धरून ती १००२७७ रुपयांना विकली जात आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने दिलेल्या माहितीनुसार, हे दर सराफा बाजाराचे स्पॉट प्राईस आहेत आणि यामध्ये जीएसटी समाविष्ट नाही. दर दिवशी दोन वेळा – एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता हे दर अपडेट केले जातात. तुमच्या गावाकडच्या सराफाने कदाचित १०००-२००० रुपयांचा वेगळा दर सांगितला तरी आश्चर्य वाटू नका. Gold Price Today

हे पण वाचा | अखेर प्रतीक्षा संपणार? मे महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता..

२२, २३, १८, १४ कॅरेटचं दर काय?

  • २३ कॅरेट सोनं: आज १४५ रुपयांनी स्वस्त होऊन ९५,२८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं.
  • २२ कॅरेट सोनं: १३४ रुपयांनी कमी होऊन ८७,६३१ रुपये प्रति १० ग्रॅम
  • १८ कॅरेट सोनं: ११० रुपयांनी घसरून ७१,७५० रुपये
  • १४ कॅरेट सोनं: ८६ रुपयांनी कमी होऊन ५५,९६५ रुपये

हे पण वाचा | मे महिन्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये; जाणून घ्या सविस्तर..

आता खरेदी करावी का थांबावं?

बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतो एवढं सोनं स्वस्त झालंय, तर घेऊन टाकावं का? की अजून वाट पाहावी? खरं सांगायचं तर, जर तुमचं लग्नकार्य, समारंभ, गुंतवणूक यासाठी सोनं घेण्याचा विचार असेल तर ही संधी चुकवू नका. कारण सोन्याचा दर अचानक पुन्हा वाढतो आणि मग हळहळ वाटते, “तेव्हा घेतलं असतं तर बरं झालं असतं. चांदी मात्र सध्या उसळी घेत आहे. आज वाढ झाली असली तरी अजूनही अनेक गुंतवणूकदार चांदीकडे आकर्षित होत आहेत. ग्रामीण भागात तर चांदीला खूप मान असतो घरातील पूजेत, साखरपुड्यात, की छोट्या गुंतवणुकीत चांदी हा नेहमीचा पर्याय असतो.

जीवनात प्रत्येक गोष्ट खरी किंमत असते तेव्हा घ्यायची असते सोनं असो वा संधी! आज सोनं स्वस्त आहे, उद्या कदाचित महाग होईल. आज चांदी महागली आहे, पण तिचं भविष्य उजळ असू शकतं. म्हणूनच, तुमच्या गरजेनुसार आणि मनासारखं आर्थिक नियोजन करून निर्णय घ्या. कारण पैसा कमावता येतो, पण योग्य वेळी घेतलेला निर्णयच पुढचं भविष्य ठरवतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा