लाडक्या बहिणींनो, ₹1500 रुपये या योजनेत गुंतवणूक करा; सरकारचा नवीन उपक्रम सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2.5 कोटी महिला लाभार्थी ठरले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक महिलांना या रकमेचे योग्य आर्थिक नियोजन कसे करायचे याची माहिती नसल्यामुळे, आता सरकारकडून त्यांना आर्थिक नियोजन धडे देण्यात येणार आहेत. Ladki Bahin Yojana News

महिलांना आर्थिक नियोजनाचा आराखडा

महिला विकास विभागाने यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपुर येथे काही महिलांनी एकत्रित येऊन छोटे व्यवसाय सुरू केले आहे, आणि तो प्रयोग यशस्वी ठरला आहे. या यशस्वी उपक्रमातून प्रेरणा घेऊन, सरकारने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा नवीन मार्ग निवडला आहे.

गुंतवणूक व बचत गटांमधून व्यवसायाचा विकास

महिलांनी दरमहा मिळणाऱ्या ₹1500 रुपयांतून ₹1000 रुपये एकत्रित करून काहीजणांनी व्यवसायासाठी आर्थिक मदत देणे सुरू केलेले आहे. 50 ते 100 महिलांचे बचत गट तयार करून भिशीच्या माध्यमातून 50,000 ते 1 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात येत आहे. यामुळे महिलांना छोटे उद्योग सुरू करण्यास प्रोत्सान मिळते.

आर्थिक साक्षरतेसाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यात अंदाजा पत्र तयार करणे, कर्ज घेणे बचत करणे आणि योग्य गुंतवणूक कशी करावी, हे शिकवले जाणार आहे. महिलांनी एकत्र येऊन व्यवसायाची साखळी तयार करावी. यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.

महिला आर्थिक विकास मंडळाचे सहकार्य

या उपक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य मिळणार तसेच महामंडळाने राज्यातील लाखो बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केलेले असून, कर्ज वसुलीचा दर शंभर टक्के राखला आहे. या योजनेत लाभातून महिलांना कर्जाची रक्कम मासिक हप्ताद्वारे परतफेड करता येईल, अशी योजना आखली जात आहे. या मुळे महिलांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

नवीन गुंतवणूक पर्यायांचा विचार

महिला विकास विभागाने महिलांसाठी म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारख्या गुंतवणूक योजनेचा विचार केला आहे. त्यामध्ये महिला दीड हजार रुपयापर्यंत गुंतवणूक करून या योजनेतून अधिक परतावा मिळू शकणार आहेत. लडकी बहीण योजना महिलांना किंवा आर्थिक सहाय्य देत नाही तर त्यांच्या भविष्य व त्यांना स्वालंबित बनवून सशक्त घडवण्याचा विचार करत आहे.

Leave a Comment