Namo Shetkari Yojana : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4 हजार रुपये जमा होणार? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana : सणासुदीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेबाबत हप्ता कधी जमा होणार. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच वारंवार प्रश्न उपस्थित केला जात होता. तो म्हणजे आमच्या हक्काचे पैसे ते म्हणजे नमो (Namo Shetkari Yojana ) शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार. या योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना यावेळेस दोन्ही हप्ते एक सोबत जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Namo Shetkari Yojana

नमो शेतकरी योजना काय ? ( What is Namo Shetkari Yojana?)

केंद्र सरकारच्या लोकप्रिय Pm किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने Namo शेतकरी महा सन्मान निधी ही स्वतंत्र योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र असणारे शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रतिकी ₹2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते. साधारणपणे केंद्राच्या PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसातच राज्य सरकारही आपला हप्ता जारी करत, हा आतापर्यंतचा शिरस्त राहिला आहे.

पैसे यायला उशीर का होतोय?

Pm किसान योजनेअंतर्गत ₹2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन आता बराच काळ पुढे सरकला आहे. मात्रा त्यानंतर अपेक्षित असलेल्या राज्य सरकारांतर्गत च्या नमो शेतकरी योजनेचा हप्ताप अद्याप शेतकऱ्यांचा खात्यावरती आलं नाही याच्या मागचं कारण देखील समोर आल आहे. सध्या शासनाच्या आर्थिक तिजोरी वरती ताण येत आहे, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना( ladki Bahin Yojana) आणि अनेक कल्याणकारी योजनेचा मोठा आर्थिक ताण. या निधीच्या तुटवड्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे.

पैसे नेमके कधी मिळणार ?

सध्या अनेक प्रसार माध्यमांमध्ये या योजनेबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केला जात आहेत परंतु अद्याप शासनाने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु काही सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकार एखाद्या मोठ्या सणाच्या किंवा विशेष दिवसाच्या मुहूर्तावरती हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची शक्यता आहे. येत्या 15 ऑगस्ट किंवा 28 ऑगस्ट या दिवशी सरकार राज्यातील बळीराजालाही आनंदाची बातमी देऊ शकतो अशी चर्चा आहे.

एकत्रित चार हप्ते मिळू शकतात?

चर्चेनुसार, फडणवीस सरकार पुढील काही दिवसांमध्ये आठवा आणि नववा हप्ता एकत्रितपणे जमा करू शकत. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागू शकते असेही सांगितले जात आहे. यंदाचा पहिला हप्ता वर्षाच्या सुरुवातीलाच झाला होता, त्यानंतर जून मध्ये पुढचं हप्ता अपेक्षित होता, पण तू अद्याप जमा झालेला नाही त्यामुळे आता उर्वरित दोन हफ्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का असा तपासा?

तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे का नाही, हे घरबसल्या तपासणी अगदी सोपा आहे. सर्वात प्रथम या योजनेचा अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉगिन करा. विनंती केलेली माहिती भरा. त्यानंतर तुमच्या खात्यातील हप्त्याची सध्याची स्थिती तुम्हाला दिसू शकते.

( टिप: वरील माहिती सूत्रांच्या आधारे आलेली असण्याबाबत अधिकृत सरकारची घोषणा झालेली नाही. अद्यावत व अचूक माहितीसाठी सरकारच्या घोषणेची वाट पहावी. )

हे पण वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! नमो शेतकरी योजनेचे  पैसे या तारखेला होणार जमा? 

Leave a Comment

error: Content is protected !!