रेशनकार्डवाल्यांनो! ई-केवायसी नसेल केलं तर मोफत रेशन बंद होणार सरकारनं दिला अंतिम इशारा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card eKYC deadline 2025 :-  राज्यातल्या लाखो गरीब कुटुंबांना दरमहा मोफत किंवा कमी दरात रेशन मिळतंय. तांदूळ, गहू, साखर, डाळ अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतात, म्हणूनच रेशन कार्ड म्हणजे गरीबांचं आधारस्तंभच! पण आता सरकारनं एक नवा नियम आणला आहे – ई-केवायसी. हा नियम न पाळल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं आणि मोफत धान्याचा लाभ बंद होणार!Ration card eKYC deadline 2025

हे पण वाचा :– शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

अंतिम मुदत ठरली  30 जून 2025 !

केंद्र सरकारनं ठणकावून सांगितलंय की, 30 जून 2025 ही शेवटची तारीख आहे. त्या अगोदर सगळ्या रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलं पाहिजे. याआधी ही अंतिम तारीख 31 मार्च होती, पण अनेकांना अडचणी आल्या म्हणून सरकारनं ती वाढवली आहे.

 ई-केवायसी नसेल केलं तर काय होणार?

  • तुमचं रेशन कार्ड काढून टाकलं जाईल.
  • मोफत किंवा सवलतीचं धान्य मिळणं थांबेल.
  • सरकारी लाभ मिळणं बंद होईल.
  • परत मिळवण्यासाठी नव्यानं अर्ज करावा लागेल!
  •  ई-केवायसी करण्याचा सोप्पा उपाय

हे पण वाचा :– शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

 ऑनलाइन पद्धत:

1. आपल्या राज्याच्या PDS वेबसाईटवर जा.

2. ‘ई-केवायसी’ किंवा ‘KYC Update’ वर क्लिक करा.

3. रेशन कार्ड क्रमांक व आधार क्रमांक टाका.

4. आधार मोबाईलला आलेला OTP द्या.

5. ‘AadhaarFaceRD’ सारखं अ‍ॅप वापरून चेहरा स्कॅन करा.

6. झालं! घरबसल्या काम संपलं.

हे पण वाचा :– महाराष्ट्रात पुढील 48 तास हाय अलर्ट ! हवामान विभागाने या जिल्ह्यांना  दिले  रेड अलर्ट

 ऑफलाइन पद्धत:

1. जवळच्या रेशन दुकानात किंवा CSC केंद्रात जा.

2. आधार व रेशन कार्ड द्या.

3. अंगठा (बायोमेट्रिक) लावा.

4. पावती मिळाल्यावर समजा, काम झालं.

  •  नाव काढलं गेलं असेल तर?
  • जवळच्या पुरवठा कार्यालयात तक्रार नोंदवा.
  • दुरुस्त कागदपत्रं घेऊन जा – आधार, मोबाईल नंबर वगैरे.
  • पुन्हा अर्ज करून रेशन कार्ड सुरू करून घ्या.

 स्टेटस कसं तपासायचं?

PDS पोर्टलवर “ई-केवायसी स्टेटस” पर्याय निवडा.

कार्ड नंबर टाका – लगेच स्क्रीनवर कळेल, काम झालं का नाही.

हे पण वाचा :– महाराष्ट्रात पुढील 48 तास हाय अलर्ट ! हवामान विभागाने या जिल्ह्यांना  दिले  रेड अलर्ट

 सरकारचा हेतू काय?

ई-केवायसीमुळे फसवे कार्ड, खोट्या नावाने धान्य मिळवणं, मृत व्यक्तींच्या नावावर लाभ घेणं – हे सर्व थांबवता येणार आहे. सरकार म्हणतंय, “जे पात्र आहेत, त्यांनाच लाभ मिळायला हवा”. त्यामुळे आधारशी रेशन कार्ड लिंक करून पारदर्शक आणि शुद्ध वितरण हेच मुख्य उद्दिष्ट आहे.

 शेतकरी, कामगार, गरोदर माता, वयोवृद्ध… कोणालाही वाचवायचं असेल तर वेळेवर करा!

खेड्यापाड्यातली लोकं आजही इंटरनेटपासून दूर आहेत. मोबाईलला नेटवर्क नाही, अप्लिकेशन समजत नाही, अंगठा लागत नाही – अशा बऱ्याच गोष्टीमुळे ई-केवायसी थांबतं. पण म्हणून वाट पाहू नका. आजच तुमचं काम CSC सेंटर, पाणीपुरवठा कार्यालय, किंवा रेशन दुकान गाठून उरकून टाका.

 अशा अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment