RBI Banking News : 3 मे 2025 — देशातील प्रमुख बँकांवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने ICICI, अॅक्सिस, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय या पाच बँकांवर एकूण दोन कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI Banking News
आरबीआयनं शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, ICICI बँकेला सर्वाधिक 97.80 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेने सायबर सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणं, केवायसीमध्ये त्रुटी, तसेच डेबिट-क्रेडिट कार्ड व्यवहारांबाबत अपारदर्शकता दाखवल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे, ग्राहकांना स्टेटमेंट न पाठवता विलंब शुल्क आकारल्याचा आरोपही आरबीआयनं केला आहे.
इतर बँकांवर काय आरोप?
बँक ऑफ बडोदा: बँकेने विमा एजन्सी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘नॉन-कॅश’ प्रोत्साहन देण्याच्या नियमांचं उल्लंघन केलं. याशिवाय काही निष्क्रिय खात्यांमध्ये ठराविक अंतराने व्याज जमा न करण्याची तक्रार होती. त्यासाठी 61.40 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
बँक ऑफ महाराष्ट्र: आधार OTP आधारित ई-केवायसी प्रक्रियेत नियामक अटींचं पालन न केल्यामुळे 31.80 लाखांचा दंड.
IDBI बँक: कृषी कर्जांवरील व्याज अनुदान योजनेत नियमभंग झाल्यामुळे 31.80 लाखांचा दंड.
अॅक्सिस बँक: केवायसी नियम आणि इतर अनियमिततेबाबत 29.60 लाखांचा दंड.
रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण काय?
या कारवाया बँकांच्या ग्राहकांसोबतच्या व्यवहारांवर परिणाम करत नाहीत, असं स्पष्ट करत आरबीआयनं सांगितलं की हा दंड फक्त नियामक त्रुटींमुळे करण्यात आलेला आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना बँकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असाही इशारा यामधून दिला गेलाय.
सतत नियमभंग का?
अलीकडच्या काळात बँकांकडून केवायसी, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांसोबतच्या व्यवहारांमध्ये अनेकदा गफलती होताना दिसत आहेत. RBI ही कारवाई केवळ दंडापुरती मर्यादित न ठेवता, बँकांना सुधारणा करण्याची गंभीर सूचना मानली जात आहे.
बातमी लेखन: Krushinews24X7 Team
हे पण वाचा | Banking News : 500 रुपयांची नोट बंद होणार का?; आरबीआयचे मोठे निर्णय, चर्चा का रंगली?
1 thought on “RBI Banking News: आयसीआयसीआय, अॅक्सिससह पाच बँकांवर रिझर्व्ह बँकेचा दंडाचा बडगा; जाणून घ्या कोणत्या चुका महागात पडल्या”