कर्जमाफी यादीत नाव आहे पण KYC होत नाही? ‘हे’ एक कारण आहे मुख्य अडथळा असं सोडवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver News  |  महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे चेहऱ्यावरती आनंद पसरला होता. परंतु आता हा आनंद काही पावलावरच अडखळत आहे. कारण यादीत नाव असून देखील अनेक शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा मोठ्या प्रमाणावर सध्या तक्रारी पुढे येत आहेत. केवायसी करताना अकाउंट सिलेक्ट होत नाही, किंवा टिक केल्यानंतर पुढे पर्याय दिसत नाही. अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून सातत्याने केले जात आहे. याच गोंधळ मागचा नेमका कारण काय आणि त्यावरती सोपा उपाय काय एकदा आपण समजून घेऊया. Loan Waiver News

नेमकी अडचण काय?  

FRLS पोर्टलवर ( Farmer loan relief system) आपले सरकार लॉगिनद्वारे शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांक (VK number) टाकून सर्च केल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते. मात्र त्यानंतर जेव्हा अकाउंट एन्टर करून केव्हाशी साठी सिलेक्ट करण्याचा पर्याय केला जातो, तेव्हा तो पर्याय पुढे सरकतच नाही. या समस्या मागचं नेमकं कारण स्क्रीनवर एका सूचनेच्या स्वरूपात स्पष्ट दिसते. आधार क्रमांक समोर फार्मर आयडी नोट प्रेझेंट इन सिस्टम असा संदेश येतो. सोप्या शब्दात सांगायचं तर, त्या शेतकऱ्यांचा ऍग्री स्टॅक फार्मर आयडी त्यांच्या आधार क्रमांकशी जोडलाच नाहीये आणि हाच फार्मर आयडी नसल्यामुळे KYC ची पुढची प्रक्रिया अडकून राहते.

कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर ! शेतकऱ्यांच्य डोक्यावरचा बोजा उतरला, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का?

फार्मर आयडी मध्ये अडचण

अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून माहितीसमोर येत आहे की त्यांच्याकडे फार्मर आयडी आधीपासूनच आहे, पण तरीही तो सिस्टम मध्ये जोडला नाही. त्याचे मुख्य दोन कारण असू शकतात.

1) फर्मर आयडी अर्धवट स्वरूपात तयार झालेला असतो, त्यापूर्वी पडताळणी झालेली नसते. म्हणजे व्हेरिफिकेशन.

2) ॲग्री स्टॅग खात्याशी मोबाईल क्रमांक जोडलेला नसल्याने शेतकऱ्याला त्या आयडी मध्ये लॉगिनच करता येत नाही.

यासाठी उपाय काय स्टेप बाय स्टेप पहा

– सर्वात प्रथम स्वतःचा फार्मर आयडी ऍग्रोस्टेकच्या अधुकृत पोर्टलवर जाऊन पुन्हा एकदा तपासून पहा.

-लॉगिन साठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरा पासवर्ड नसल्यास तो नव्याने सेट करून घ्या.

-फार्मर आयडी व्यवस्थित आणि पूर्ण असल्याची खात्री झाल्यावर, तो तात्काळ आपल्या बँक शाखेत जाऊन जमा करा.

-बँकेच्या लॉगिनमार्फत हा फार्मर आयडी सिस्टमशी जोडला जाईल आणि एकदा हे लिंकिंग झालं, की लगेच केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येते.

-जर फार्मर आयडी अस्तित्वात नसेल, तर तो नव्याने काढावा लागेल हे काम बँकेतून सीएससी सेंटरवरून किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ॲग्री स्टॅक पोर्टलवर लॉगिन करून करता येतं.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा फार्मलायडी नसणं म्हणजे कर्जमाफी पासून कायमचं वंचित राहणार असा त्याचा अर्थ नाही. आयडी काढून तो वेळेत जोडल्यास प्रक्रिया पुन्हा सुरू होते.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी वेगळी प्रक्रिया (OTS काय आहे ? )

ज्या शेतकऱ्यांवरती दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे, त्यांच्यासाठी केवायसी प्रक्रिया थोडी वेगळीच आहे. अशा शेतकऱ्यांना बँकेकडून वन टाइम सेटलमेंट (OTS) अंतर्गत एक ठराविक रक्कम निश्चित करून दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या संमती द्यावी लागते, त्यानंतर बँक OTS साठीचा स्वतंत्र फॉर्म भरून घेते आणि पुढची प्रक्रिया पार पाडते. एकदा ओटीएस रक्कम निश्चित झाली, किंबहुळ कर्जातून ती रक्कम वजा होऊन उरलेली शिल्लक रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाते. आणि याच प्रक्रियेतून त्याची प्रत्यक्षात कर्जमाफी पूर्ण होते.

शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं?

-फार्मर आयडी अजून काढला नसेल, तर तो तात्काळ काढून घ्या.

-आधीच आयडी असेल, तर तो व्यवस्थित लिंक झालाय की नाही, चे लॉगिन करून एकदा स्वतः तपासा.

– आयडी बरोबर असल्यास, वेळ न घालवता जवळच्या बँक शाखेत जाऊन तो तपासा.

-दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनी OTS प्रक्रियेसाठी बँकेची संपर्क साधून आवश्यक फॉर्म वेळेत भरा.

या छोटासा तांत्रिक अडथळ्यामुळे अनेक पात्र शेतकरी उगाच गोंधळून जात आहे पण योग्य माहिती आणि वेळेत उचललेले एक पाऊल, यामुळे ही प्रक्रिया पुन्हा सुरळीत मार्गी लागू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!