Astrology Today : १२ मे २०२५… सकाळचे साडेआठ वाजून पंचावन्न मिनिटांचा वेळ… आकाशात एक महत्त्वाचा क्षण आकार घेतो आहे. सेनापती मंगळ ग्रह आपली जागा बदलतोय. ग्रहांच्या या हलचालीकडे बघताना ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं “जिथं मंगळ जाईल, तिथं उर्जेचा नवा प्रवाह वाहू लागतो.” आणि यंदा तो काही खास राशींसाठी खूप शुभ संकेत घेऊन आलाय. Astrology Today
मंगळ शौर्य, आत्मविश्वास, संघर्ष आणि यशाचं प्रतीक. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असलेला मंगळ १२ मेपासून कर्क राशीत गोचर करणार आहे. आश्लेषा नक्षत्रात राहणारा हा मंगळ, बुध ग्रहाच्या प्रभावात सुद्धा येईल, आणि त्यामुळे व्यवसाय, संवाद, घरगुती नातेसंबंध या सगळ्या गोष्टींवर परिणाम होणार आहे.
यंदाचं मंगळाचं गोचर म्हणजे जणू नशीबाचा दरवाजा काही राशींसाठी उघडणार आहे. करिअर, पैसा, नातेसंबंध, आरोग्य आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींमध्ये मोठे सकारात्मक बदल दिसणार आहेत. चला पाहूया कोणत्या ३ राशींचं नशीब मंगळाच्या कृपेने फुलणार आहे.
हे पण वाचा | Horoscope Astrology : या राशींचे दिवस बदलणार! नशीबाची मिळणार सात, पैसा आणि यश दोन्हीही मिळणार
१. मिथुन – मंगळाची कृपा, पैशांचा फायदा, नात्यांमध्ये गोडवा
मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळाचं हे गोचर सोन्याहून पिवळं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. विशेष म्हणजे आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. गुंतवणुकीचे मार्ग खुले होतील, अचानक धनलाभाची शक्यता निर्माण होईल. घरगुती वातावरणात प्रेम, शांतता आणि समाधान निर्माण होईल. परंतु, वाणीवर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं – कारण कधी कधी उत्साहात बोललेली एक चुकीची गोष्ट संबंधांमध्ये कटुता आणू शकते.
२. तूळ – अडथळे हटणार, घरात समाधान, कामात यश
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण म्हणजे एक नवा श्वासच ठरेल. आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळेल. गेल्या काही महिन्यांपासून जे काही अडथळे येत होते – ते आता मागे हटतील. व्यवसायात किंवा नोकरीत नवीन संधी मिळतील. घरगुती पातळीवर सुद्धा काही आनंददायक घटना घडतील जसं की नवं घर, लग्नाची बातमी, किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीशी मनमोकळं बोलणं. आरोग्यही बऱ्याच अंशी सुधरेल, त्यामुळे मानसिक ताण कमी होईल.
३. मकर – उत्पन्नाचे नवे दरवाजे, आरोग्य उत्तम, प्रतिष्ठा वाढेल
मकर राशीसाठी मंगळाचं हे गोचर चांगल्या काळाची सुरुवात करणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यवसायात लाभ होईल, नोकरीत बढतीची शक्यता असेल. विशेष म्हणजे तुमच्या कामाचं कौतुक होईल मग ते वरिष्ठांकडून असो वा समाजाकडून. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ फारच पोषक आहे. काही अडलेली कामं चुटकीसरशी पूर्ण होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील.
हे पण वाचा | Ganga Saptami 2025 : त्रिपुष्कर आणि रवि योगाच्या महासंयोगाने खुलणार ५ राशींचं भाग्य, मिळणार हवी ती प्रत्येक गोष्ट!
मंगळाच्या उर्जेचा सार्थ उपयोग करा!
हे संक्रमण म्हणजे फक्त ग्रह बदल नाही, तर तुमच्या जीवनातील दिशा बदलण्याची एक संधी आहे. मंगळाची ऊर्जा जर योग्य रीतीने वापरली, तर ती तुम्हाला साहस, यश आणि समृद्धीकडे नेईल. परंतु गरज आहे संयमाने आणि शहाणपणाने निर्णय घेण्याची. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन करतं, पण कृती आपल्या हातात असते.
(डिस्क्लेमर : वरील लेख फक्त प्रसारमाध्यम आधारित आहे. यावर अंधविश्वास न ठेवता विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत.)