अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘ओला इलेक्ट्रिक’ स्कूटरवर तब्बल ४०,००० रुपयांची सूट! आजच शेवटचा दिवस, संधी गमावू नका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ola Electric Benefits Upto 40000 Rupees: आज अक्षय्य तृतीया! सोने खरेदीप्रमाणेच इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठीही हा दिवस खास ठरणार आहे. देशातील आघाडीची ईव्ही उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने आपल्या सर्व स्कूटर मॉडेल्सवर ४०,००० रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. ही सणासुदीची ऑफर फक्त आज ३० एप्रिल साठी मर्यादित असून, ग्राहकांना यामध्ये एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी देखील मोफत मिळणार आहे. मार्च महिन्यात विक्रीत झालेल्या घसरणीनंतर ओलाने हा सणाचा मुहूर्त साधत विक्रीला चालना देण्याची मोठी चाल खेळली आहे. Ola Electric Benefits Upto 40000 Rupees

कंपनीचे विविध मॉडेल्स आणि त्यांची खास वैशिष्ट्ये

ओला इलेक्ट्रिक सध्या बाजारात S1, S1 Pro, S1 X, आणि S1 X+ अशा अनेक स्कूटर मॉडेल्ससह आपला ठसा उमटवत आहे. यातील प्रत्येक मॉडेल वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे आणि त्यांच्या रेंजपासून ते टॉप स्पीडपर्यंत सर्व काही ग्राहकाच्या गरजेनुसार सुसज्ज आहे.

ओला S1 Pro आणि Pro+ ची रेंज व किंमत

S1 Pro मॉडेल दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे – 3 kWh व 4 kWh. यातील 4 kWh बॅटरी असलेल्या मॉडेलची रेंज तब्बल 242 किलोमीटर पर्यंत आहे. त्याची किंमत ₹1,14,999 पासून सुरू होते.

S1 Pro+ हा आणखी प्रगत मॉडेल असून यात 4 kWh व 5.3 kWh बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत. 5.3 kWh चा मोठा बॅटरी पॅक 320 किलोमीटरची रेंज देतो आणि 141 kmph टॉप स्पीड गाठतो. याची किंमत ₹1,54,999 पासून सुरू होते.

ओला S1 X आणि X+ – स्वस्तात परफॉर्मन्स

ओला S1 X हा बजेट अनुकूल मॉडेल आहे जो 2, 3 आणि 4 kWh बॅटरी पर्यायांत उपलब्ध आहे. त्यापैकी:

2 kWh: 108 किमी रेंज

3 kWh: 176 किमी रेंज

4 kWh: 242 किमी रेंज

या मॉडेलची किंमत फक्त ₹79,999 पासून सुरू होते.

ओला S1 X+ हे मॉडेल केवळ 4 kWh बॅटरी पॅक सह सादर करण्यात आले आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर 242 किमी पर्यंत धावते आणि 125 kmph च्या टॉप स्पीडसह जबरदस्त परफॉर्मन्स देते. याची सुरुवातीची किंमत ₹1,07,999 आहे.

फक्त आजच संधी – ही ऑफर गमावू नका!

आजच्या दिवसापुरती ही खास ऑफर दिली जात आहे. या सणासुदीच्या ऑफरमध्ये केवळ सूटच नाही, तर एक्स्ट्रा बॅटरी वॉरंटी मिळत असल्याने ही खरेदी दीर्घकालीन फायदेशीर ठरू शकते. पेट्रोल दरवाढ आणि पर्यावरणीय जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक आता ईव्ही खरेदीकडे वळत आहेत. अशातच ओलाने दिलेल्या या सूटमुळे आज ई-स्कूटर घेण्याचा सर्वोत्तम दिवस ठरू शकतो.

हे पण वाचा |   1 एप्रिल पासून या नियमांमध्ये होणार मोठे बदल! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

Leave a Comment