new rules update :- नागरिकांसाठी एक मोठी बातमी, दोन दिवसांनी एप्रिल महिना सुरू होणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्र व केंद्र सरकारने अनेक नवीन नियमाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. या नवीन नियमांमध्ये फास्टट्रॅक, टोल शुल्क, एकराची एक नोंदणी प्रणाली नवीन नंबर प्लेट व पेन्शन योजनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. new rules update
या नियमांमध्ये होणार बदल :-
FASTag नवीन नियम लागू
1 एप्रिल पासून राज्यामध्ये सर्व वाहनासाठी FASTag आवश्यक करण्यात आले आहे. जर तुमच्याकडे FASTag नसेल तर त्यासाठी तुम्हाला आता दुप्पट दंड द्यावा लागणार आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत सर्व टोल नाक्यावर रोख व्यवहार बंद करून डिजिटल पेमेंट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
CNG व इलेक्ट्रिक वाहनांवर आता वाढीव कर :-
CNG व PNG वाहनांसाठी आता नवीन कर आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनावर आता 6% अतिरिक्त शुल्क लागणार आहे व बांधकाम क्षेत्र किंवा आणि हलक्या मालवाहू वाहनावर 7% टक्के कर सरकारने लावला आहे.
HSRP नंबर प्लेट नवीन नियम :-
राज्य सरकारने आता नंबर प्लेट बद्दल एक नवीन निर्णय घेतला आहे, सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आता आवश्यक केले आहे. एक एप्रिल 2019 पूर्वी त्या वाहनावर 31 मार्च 25 पर्यंत नवीन नंबर फिट बसवणे बंधनकार केले आहे. नवीन निर्णयामुळे आता अपघात आणि वाहन चोरी प्रतिबंध करण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
पेन्शन योजनेबद्दल नवीन निर्णय :-
सरकारने नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे, एक एप्रिल पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना अमलात येणार आहे यामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना निश्चित रक्कम मिळण्याची हमी देखील सरकारने दिली आहे.
GST नियमामध्ये बदल :-
1 एप्रिल पासून इनपुट टॅक्स डिस्ट्रीब्यूटर प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे व व्यवसायांनी इनपुट टॅक्स क्रेडिट साठी वेळेत नोंदणी करणे गरजेचे झाले आहे याचे पालन नाही केल्यास आता नागरिकांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “ 1 एप्रिल पासून या नियमांमध्ये होणार मोठे बदल! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री”