पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price : गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा फटका बसलेल्या सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून, याचा थेट फायदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जुलैसाठी ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर ०.६१% नी घसरून ६०.६९ डॉलर प्रति बॅरलवर आले असून, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ५७.७३ डॉलर प्रति बॅरलवर आहे. या घसरणीमुळे देशांतर्गत इंधन दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Petrol Diesel Price

जागतिक घडामोडींचा परिणाम

कच्च्या तेलाच्या या घसरणीमागे दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचं संकेत मिळाले आहेत. दुसरं म्हणजे सौदी अरेबिया आपल्या तेलपुरवठ्यात वाढ करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत खाली आली आहे.Petrol Diesel Price

ब्रेंट क्रूड ५५ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता

नवी दिल्लीतील वेल्थस्ट्रीट रिसर्च फर्मच्या तज्ज्ञ सुगंधा सचदेवा यांनी सांगितलं की, “कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी घसरणीचा धोका आहे. मागणी कमी आणि पुरवठा अधिक झाल्यामुळे ब्रेंट क्रूडचे दर ५५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरू शकतात.”

तेल कंपन्यांकडून दरकपातीची वाट पाहत ग्राहक

गेल्या वर्षी मार्चमध्ये कच्चं तेल ८४.४९ डॉलर प्रति बॅरल असताना केंद्र सरकारने प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली होती. सध्या पेट्रोल-डिझेलवर तेल कंपन्यांना प्रतिलिटर १० ते १२ रुपयांचा नफा मिळतोय, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच ग्राहकांना वाटतंय की आता दर कमी झालेच पाहिजेत.

सरकारकडून अजून निर्णय नाही

८ एप्रिल रोजी इंडियन ऑइलने पेट्रोलची बेस प्राईज ५४.८४ वरून ५२.८४ रुपये केली, पण त्याचवेळी सरकारने उत्पादन शुल्क वाढवून त्याचा फायदा घेतला. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला काहीच दिलासा मिळाला नाही. दिल्लीत पेट्रोल सध्या ९४.७७ रुपये तर डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे.

अमेरिकेतील साठ्यात घट – सौदीचा दबदबा कायम

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा साठा २७ लाख बॅरलने घटला. साठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा होती, पण उलट घट झाल्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच सौदी अरेबिया सध्या तेलाच्या दरांबाबत दबावात नसल्याचं दिसतं. उलट ओपेक प्लस देश जूनमधील बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

केव्हा मिळणार दिलासा?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ५५ डॉलरच्या आसपास स्थिर राहिले, तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासाठी केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून ठोस निर्णय होणं गरजेचं आहे. जर तेल कंपन्यांनी आणि सरकारने दरकपातीचा निर्णय घेतला, तर सामान्य ग्राहकांना महागाईपासून थोडासा दिलासा मिळू शकतो.

बातमी लेखन: Krushinews24X7 Team

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अनुदान वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment