Pm Kisan 19th installment Date : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचे बातमी समोर आलेले आहे लवकर त्यांच्या खात्यावरती आता पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारीतून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यात येणार आहे. Pm Kisan 19th installment Date
सध्या देशभरातील शेतकरी व नागरिक 19 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पनाची वाट पाहत आहे. या अर्थसंकल्पनामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये वाढ होणार अशा चर्चांना उधाळ आलेला आहे. सध्या या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षासाठी ₹6000 आर्थिक मदत दिली जाते. मदत वाढून सरकार ₹12 हजार रुपये करणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM- Kisan ) योजनेचा १९ हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार इथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी कृषी मंत्री यांनी दिली.
या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना हप्ता म्हणून दोन हजार रुपये थेट त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तसेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम इथून अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. या योजनेचा लाभ सुमारे नऊ कोटी हून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे.
PM Kisan सन्मान निधी योजना कधीपासून सुरू झाली?
शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी 2019 मध्ये ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे व त्यांचे स्वावलंबीकरण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली ही रक्कम तीन हत्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामुळे थेट जमा केले आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 18 हप्ते मिळाले आहे.
Pm Kisan योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो का?
Pm Kisan योजनेचा लाभार्थ्यांचे ऑनलाईन यादी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव यादीत आहे का? हे सहज तपासता येणार आहे यासाठी खालील दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो का जाणून घेण्यासाठी या योजनेच्या अगोदर वेबसाईटवर जा.
- तिथे गेल्यानंतर “Farmer Corner” या पर्यावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडल्यानंतर “लाभार्थी यादी” (Beneficiary List) या पर्यावर क्लिक करा.
- इथे तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक, गाव निवडा.
- सर्व माहिती भरून “get Report” वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19वा हप्ता होणार जमा”