PM Kisan 20th Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २० व्या हप्त्याकडे देशभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात १९वा हप्ता वितरित झाल्यानंतर शेतकरी आता जून महिन्यात पुढील हप्त्याची वाट पाहिली जात आहे. सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली, तरी प्राथमिक माहितीवरून जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.PM Kisan 20th Installment
गरीब शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना
केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन टप्प्यांत म्हणजे दर चार महिन्यांनी प्रत्येकी २,००० रुपयांच्या स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी थेट आर्थिक हातभार लावणे.
या महिन्यात खात्यावर जमा होणार हप्ता
लवकरच आता खरीप हंगाम सुरू होणार आहे. जून मध्ये हा हप्ता जमा झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. अनेक शेतकरी त्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही, यासाठी रोज बँकेत जाऊन खात्री करत आहेत. कारण शेतमालाला योग्य दर मिळत नाही, शेतीसाठी लागणाऱ्या खते, बियाणे आणि मजुरांच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अशावेळी PM किसान योजनेचा हप्ता म्हणजे थोडा का होईना, पण दिलासा देणारा श्वास.
कोण पात्र?
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे आणि जे सरकारी सेवेत नाहीत, अशा शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. ‘कुटुंब’ यामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होतो.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, मोबाईल नंबर, जमिनीच्या मालकीची कागदपत्रे
अर्ज कसा कराल?
1. अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
2. ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
3. वैयक्तिक माहिती व बँक खात्याचे तपशील भरा.
4. जमीनधारक असल्याचे पुरावे अपलोड करा.
5. OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा.
शेतीवरचा भार कमी होणार?
पावसाळा तोंडावर आला आहे. बी-बियाणं, खतं, मशागत यासाठी लागणारा खर्च दरवर्षी वाढतो आहे. अशा वेळी या २,००० रुपयांच्या हप्त्याचा उपयोग शेतकरी तातडीच्या खर्चासाठी करतात. हे पैसे फारसे मोठे नसले तरी वेळेवर मदत मिळणं हेच खूप महत्त्वाचं आहे.
ज्यांनी यापूर्वी अर्ज केला असेल आणि नियमित हप्ते मिळवत असतील, त्यांनी ‘PM Kisan Beneficiary Status’ विभागात जाऊन आपला हप्ता जमा झाला आहे की नाही, याची माहिती तपासावी. जर काही अडथळा असेल, तर स्थानिक कृषी अधिकारी किंवा CSC केंद्राशी तात्काळ संपर्क साधावा.
बातमी लेखन : Krushinews24X7 Team
हे पण वाचा : शेतकऱ्यांना करता येणार pm Kisan योजनेला नवीन नोंदणी! पहा सोपी पद्धत