Mukhymantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपत आला आहे मात्र तरीदेखील महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत, अखेर लाभार्थी महिलांना पैसे कधी मिळणार असा सवाल महिला वारंवार विचारत आहेत. मात्र आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये पुढील 48 तासात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. नवीन निकषानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून का झाला नाही जमा? आली मोठी माहिती समोर
फेब्रुवारी महिना संपायला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे पुढील 48 तासात महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होतील का असा प्रश्न महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन निकषानुसार महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारे ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकली आहे. लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा करण्यात आली होती. Mukhymantri Ladki Bahin Yojana
त्यानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यापासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. पडताळणी दरम्यान ज्या महिला निकषात बसत नाहीत त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. या पडताळणीनंतर आत्तापर्यंत एकूण नऊ लाख महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून 3 कोटी 490 कोटी देण्यात आले आहेत.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! तब्बल 40 लाख लाभार्थी महिला या कारणामुळे होणार अपात्र?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापर्यंत दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात संपण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असले तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात आठव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाही. मात्र आता आज हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
3 thoughts on “लाडक्या बहिणीच्या खात्यात 48 तासात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? पहा सविस्तर माहिती”