Ration Card New Update: शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या नागरिकांचे रेशन कार्ड ला आधार लिंक नसेल त्या नागरिकांचे स्वस्त धान्याचा लाभ मिळणे बंद होणार आहे. अशा सक्त सूचना अन्न व पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना वारंवार सूचना देऊन देखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लाभार्थ्यांचे मार्च एप्रिल पासून धान्य बंद केले जाणार आहे.
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्नाचा पुरवठा केला जातो. देशात अनेक लोक या योजनेअंतर्गत मोफत धान्य घेतात. मात्र धान्य वितरणात सुलभता येण्यासाठी रेशन कार्ड वरील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने रेशनला जोडून घेणे सरकारने बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया तुम्ही रेशन दुकानात जाऊन ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी करून घेऊ शकता.
हे पण वाचा | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लिटर मागे झाली इतक्या रुपयांची वाढ
शासनाच्या आदेशानुसार स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना आधार शेडिंग ही केवायसी करण्याचे काम 28 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करायचे आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांनी ते करून घ्यावे. त्यानंतर त्यांना मोफत रेशन मिळणे बंद होणार आहे. वारंवार सूचना देऊनही लाभार्थ्यांचे आधार शेडिंग रखडले आहे. त्याचबरोबर शासन आदेशाप्रमाणे ई केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे. या संदर्भातही वारंवार सूचना करून देखील अनेक जणांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या नागरिकांना आता 28 फेब्रुवारीपासून मोफत रेशन मिळणे बंद होणार आहे.
हे पण वाचा | राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मिळणार कृषी साहित्य खरेदीवर 50% अनुदान ?
रेशन अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व सरकारी योजनेचा लाभ देखील लाभार्थ्यांना मिळणे बंद केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. त्यामुळे रेशनवर आधारित सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी बायोमेट्रिक पद्धतीने ही केवायसी प्रक्रिया जवळील रेशन दुकानात जाऊन करायची आहे.Ration Card New Update
रेशन कार्ड ची ई केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड च्या मदतीने तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. ज्या नागरिकांनी आपली इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच 28 फेब्रुवारीपासून मोफत रेशनचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे या बातमीकडे कोणत्याही शिधापत्रिका धारकांनी दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा