agriculture subsidy online form : राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवले जात असतात. अशातच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण की आता जग तंत्रज्ञानाकडे वळलेले आहे. आणि अशातच आता शेतकऱ्यांनाही शेतात तंत्रज्ञान चा उपयोग करावा लागत आहे. तर केंद्र सरकार आता अत्याधुनिक अवजारांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. तर ही मदत कशाप्रकारे असणार आहे आपण खालील सविस्तर माहिती पाहू.agriculture subsidy online form
कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी उपकरणावर अनुदान मिळवण्यासाठी अनेक योजना चालू केलेला आहे. अशाच शेती अवजारे अनुदान ही योजना अत्यंत फायद्याचे आहे कृषी आयुक्तालयाच्या उपसंचालक सुश्मिता तवटे यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे. तर आज आपण कृषी अवजारे अनुदान या योजनेत संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
असा करा ऑनलाईन अर्ज :-
तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाइन प्रकारे अर्ज करावे लागेल शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर लॉगिन करून आपला अर्ज भरावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असेही उपसंचालक यांनी म्हटले आहे. शेतकरी बांधव आपल्या जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन सुद्धा हा अर्ज भरू शकतो. कृषी अवजारे अनुदानासाठी शेतकऱ्यांना कोणत्या अवजाराची गरज आहे? आणि या अवजारांना किती अनुदान उपलब्ध आहे या सर्व माहिती तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या तुम्हाला तिथे या योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल.
या ठिकाणी करा अर्ज :-
तर मित्रांनो, या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही https://mahadbt.maharashtra.gov.in येथे गेल्यावर तुम्हाला या योजनेसंदर्भात अधिक माहिती व नवीन नवीन अनुदाना संदर्भात नियम येथे माहीत होईल. महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने शेतकऱ्यांना यादव कृषी यंत्रसामग्री मिळवून त्यांच्या उत्पन्न क्षमता व उत्पादन वाढवण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.