Weather forecast : महाराष्ट्रात पावसाचा खेळ सुरूच! काही भागात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी उकाड्याचा तडाखा – हवामान खात्याचा अलर्ट जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather forecast : एप्रिल २८: राज्यात सध्या हवामान पूर्णपणे बदलले आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी हवामानात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांतही पावसाचा सिलसिला काही भागांत सुरू राहणार असून, काही ठिकाणी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. Weather forecast

विदर्भात थंडसथॉमचा पाऊस, विजा चमकल्या

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी सांगितले की, विदर्भात काही भागांत विजांच्या कडकडाटासह थंडसथॉमचा पाऊस झाला आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे वातावरणात निर्माण झालेली ओलावा. त्यामुळे ढग दाटले आणि पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रात तापमानात झपाट्याने वाढ

मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमान सतत ४० ते ४२ अंशांवर पोहोचत आहे. यामुळे उन्हाचा तडाखा अधिक जाणवतोय. आद्रतेचा अभाव असल्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण नाही, आणि त्यामुळे उकाड्यात अधिक वाढ होताना दिसते आहे.

पुढील काही दिवस हवामान कसं असणार?

सानप यांच्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवस विदर्भात थंडसथॉम पावसाचा अंदाज आहे. तसेच काही भागांत सोसाट्याचे वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ४ मेपासून ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात.

कोकणात मात्र उकाड्याचेच वर्चस्व

कोकण आणि गोवा विभागात १ मे ते ४ मे दरम्यान कोरडे हवामान राहणार आहे. मात्र ४ मेनंतर काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनी काय करावं?

हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी पुढील पेरणीसाठी नियोजन सुरू ठेवावं. ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी जमिनीत ओलावा निर्माण होईल, पण पेरणी करण्यापूर्वी पुढील ७ दिवसांचा अंदाज पाहणे गरजेचे आहे, असा सल्ला कृषी तज्ज्ञ देत आहेत.

हे पण वाचा | Vidarbha Rain Alert : राज्यातील या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता! भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहिला का?

बातमी लेखन : Krushinews24X7 Team

Leave a Comment