agriculture subsidy online form : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी ट्रॅक्टर अनुदानासंदर्भात आहे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर मिळणार 90% अनुदान म्हणजे जाता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 90 टक्के सबसिडी मिळणार. तर तुम्हालाही ट्रॅक्टर वर सबसिडी हवी असेल तर खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा तुम्हाला नक्कीच अनुदान मिळून जाईल.agriculture subsidy online form
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेतील मिनी ट्रॅक्टर या यंत्रावर शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या 2017 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना ट्रॅक्टर व त्यांच्या विविध कृषी साधनांच्या खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे. हे अनुदान एकूण 3.50 लाख रुपयांच्या प्रकल्प खर्चावर 90 टक्के म्हणजेच 3.15 लाख रुपये असे असेल. या योजनेत बचत गटांना फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
तर आता आपण या योजनेविषयी अटी आणि तुम्ही अर्ज कशाप्रकारे भरणार आहोत याची सविस्तर प्रक्रिया जाणून घेऊ. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा बचत गटामध्ये किमान 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे अति आवश्यक आहे. तर अर्जदार बचत गट महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रातीलच लागू आहे.
तर आता इच्छुक उमेदवारांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपला ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करावे लागेल www.mini.mahasamajkalyan.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करावे लागेल. तर या योजनेच्या अंतर्गत तुमची निवड कशाप्रकारे होईल ही माहिती खालील दिलेली आहे.
या योजनेच्या अनुदानासाठी अर्ज गेलेल्या बचत गटांची निवड काही अटी आणि शर्तींना लागून केली जाणार आहे. म्हणजे जे बचत गट या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या सर्व अटी आणि कागदपत्र व्यवस्थित असेल तरच या अर्जाची मंजुरी होईल. आणि महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत बचत गटांना अनुदान देण्यात येईल.
1 thought on “शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 90% अनुदान अर्ज प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा”