New Rules Update: आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असल्यामुळे आज या महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. एक मार्च 2025 पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात आर्थिक नियोजनात थेट परिणाम करू शकतात. एक मार्चपासून कोणत्या नियमात बदल होत आहे आणि त्याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. New Rules Update
- बँक एफडी वरील नियमात बदल
जर तुम्ही एखाद्या बँकेत फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हा होणारा बदल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मार्च 2025 पासून बँक एफडीच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलामुळे व्याजदर, कर नियम आणि पैसे काढण्याच्या पद्धतीमध्ये काही फरक पडणार आहे. बँक आता त्यांच्या आर्थिक गरजेनुसार व्याजदरात अधिक लवचिकता ठेवू शकतात. त्यामुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा मोठा परिणाम पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी एफबी करणाऱ्या गुंतवणूकदरावर होऊ शकतो. जर तुम्ही देखील एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी हा होणारा बदल अतिशय महत्त्वाचा आहे.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत मिळेल जबरदस्त परताव; जाणून घ्या सविस्तर माहिती
- एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल
तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करत असते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत काही ना काही बदल होत असतो. त्यानुसार एक मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील वाढ किंवा कपात होऊ शकते. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत योग्य माहिती एक मार्च 2025 रोजी सकाळी सहा वाजता समोर येईल. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होते का घसरण हे पाहण्यासारखे राहणार आहे.
- ATF आणि CNG-PNG घरामध्ये बदल होण्याची शक्यता
विमान इंधन म्हणजे इयर टर्बाइन इंधन (ATF) तसेच संकुचित नैसर्गिक वायू (CNG) आणि पाईपलाईन नैसर्गिक वायू (PNG) यांच्या दरामध्ये देखील दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदल होत असतो. ज्यामुळे एक मार्चपासून या इंधनाच्या किमतीत वाढणार की कमी होणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे. याकडे वाहनचालक आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. इंधन दर वाढल्यास प्रवासी आणि वाहतूक याचा खर्च देखील वाढतो. त्यामुळे याचा किमतीत होणारा बदल सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम करू शकतो.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात 48 तासात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? पहा सविस्तर माहिती
- म्युचल फंड आणि डिमॅट खात्यामध्ये नवीन नियम
भारतीय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) म्युचल फंड पोलिओ आणि डिमॅट खात्यासाठी नवीन नियम लागू केला जाणार आहे. एक मार्चपासून या नियमानुसार नामांकित प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार आहेत. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मालमत्ता हस्तांतरित करताना अधिक सोयीस्कर प्रक्रिया असेल. यामुळे गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता आणि पारदर्शकता निर्माण होईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा