या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये? या तारखेला होणार खात्यामध्ये जमा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana :- शेतकऱ्यांसाठी अति आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी बिहार एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे व त्या ठिकाणी ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

त्याचबरोबर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता 1 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे व दोन्ही हप्ते मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना एकत्रित चार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे.

शेतकऱ्याला मिळणार दिलासा :- 

राज्य सरकार व केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी अनेक  मोठे  सुरू केले आहे पीएम किसान योजनेच्या मागील हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातून वितरित आला होता. त्याचबरोबर नमो सन्मानित योजनेचे देखील वितरण करण्यात आले होते पीएम किसान योजनेअंतर्गत 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर या हप्त्याची दोन हजार रुपये जमा झाले होते. व 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले होते.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

Kyc करणे बंधनकारक :- 

पीएम किसान योजनेचा 19 वा  हप्ता मिळवण्यासाठी आता पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य झाले  तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल व तुम्ही अजून देखील या योजनेची केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. तुमच्या जवळच्या  आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन तुम्ही pm kisan योजनेची केवायसी करू शकता.

Pm Kisan योजनेसाठी या शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम घरी जात आहे या योजनेमध्ये राज्यातील तब्बल 91 लाख शेतकरी पात्र आहे. व या प्रात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते प्राप्त झाले आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

Leave a Comment